🔥आष्टी ते थार रोडवर जंगलात सतत तीन कळपातील तीन गाई वर हल्ला गुराखी वर्गात दहशत.
आष्टी शहीद -/ थार ते आष्टी रोडवर असणाऱ्या जंगल परिसरात चरईसाठी गेलेल्या म्हशीच्या कळपातील गाई वर वाघाने जीवघेणा हल्ला केला,गुराखी धावल्याने गाय वाचली खरी पण गंभीर जखमी झाली. ही घटना दि. १४ऑगस्ट रोजी दुपारी ३वाजता जंगलात घडली.दुसरी घटना १५ऑगस्ट रोजी, तिसरी घटना १६आगस्ट रोजी घडली यां घटनेने गोपालक दहशतीत आहे.
सविस्तर असें कि,
आष्टी तालुक्यातील संजय बहिरट राहणार थार,अमोल हिरणवाडे, देवराव कामडी यांच्या कडे गाईचा व म्हशीचा मोठा कळप आहे. गुरांना चरईसाठी आष्टी ते थार रोडवर रोजच नेण्यात येते. रोजच्या प्रमाणे म्हशीचा कळप जंगलात चरत असताना दबा धरून बसलेल्या पट्टेदार वाघाने गाईवर अचानक हल्ला केला.हा हल्ला एक दिवस नव्हे तर सतत तीन दिवस तीन गाई वर हल्ला केल्याचे पाहून इतर जनावरे बिथरली गाईने हम्बरडा फोडला हा आवाज गुराख्याने आइकताच गुराखी वाघाच्या दिशेने धावला आणि वाघ पळून गेला मात्र यां हल्ल्यात तीन गाय गंभीर जखमी झाल्या यां घटनेची माहिती गुराचा मालक संजय बहिरट, अमोल हिरणवाडे यांना देण्यात आली त्यांनी वनविभागाचे वनपाल चौधरी यांना फोनवरून यां घटनेची माहिती दिली. चौधरी यांनी तात्काळ घटना स्तळं गाठून पंचनामा केला. गंभीर जखमी गाईना वाहणात टाकून घरी नेण्यात आले. सरकारी डॉक्टर यांनी गाईवर इलाज केला. जखमी गाय शेवटची घटका मोजत आहे. संजय बहिरट, अमोल हिरणवाडे, देवराव कामडी यांना वनविभागाकडून आर्थिक मदत मिळावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.