डॉ.लांबट उत्तम संघटक,खेळाडू,मार्गदर्शक म्हणून ओळख.
देवळी -/ युवा-क्रांती संघटनेचे जेष्ट संघटक डॉ.अरुण तरास विविध खेळामध्ये उत्कृष्ट खेळाडू व मार्गदर्शक होते.खेळाडू चे संघटक करून हा त्यांचा मार्गदर्शन करुन हा त्यांचा पिंड होता.अन्याया प्रति लढणे तसेच विद्यार्थी यांच्या एस टी बस पासेस सुरु करण्याच्या आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग होता.असे त्यांचे अष्टपैलू व्यक्तीमत्व होते.जेस्ट नागरीक संघाचे डॉ. दामोधर लांबट यांनी श्रद्धांजली अर्पण करताना आपले मत व्यक्त केले. डॉ अरुण तरास यांचे आजाराने हैदराबाद येथे निधन झाले. त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्याकरिता देवळी येथील दत्त मंदिर संभागृहात श्रध्दांजलीचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला.यावेळी युवा क्रांती संघटनेचे संस्थापक बाबा जोशी अध्यक्षस्थानी होते.यावेळी डॉ दामोदर लांबट,भाऊराव इंगेले,शरद भोंग नागपूर,शिवसेना माजी जिल्हाप्रमुख अशोक काकडे,खेळाडू वासुदेव गरवारे,मुकुंद तरास,शरद आदमने,श्याम घोडे, तसेच युवा क्रांतीचे माजी अध्यक्ष शेख सत्तार यांची प्रमुख उपस्थीती होती.गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने प्रथम ध्यान प्रार्थना करण्यात आली त्यानंतर श्रद्धांजली अर्पण करतांना डॉ अरुण तरास यांच्या जीवनातील प्रसंग व त्यांच्या समाज कार्या विषयी मत व्यक्त केले.अध्यक्षीय भाषणात बाबा जोशी यांनी डॉ.अरुण तरास जातीने ब्राम्हण होते पण त्यांचे काम क्षत्रिय बाण्याचे होते विविध खेळा सोबत समाजकार्य व अन्यायाप्रती आक्रमक होउन न्याय मिळून देण्याकरिता त्यांचे कार्य राहले असल्याचे सांगितले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन,विलास जोशी यांनी केले तर आभार शेख सत्तार यांनी मानले कार्यक्रमाला सोपान लोखंडे,सुशिल उंबरे,अनंतराव देशमुख,वसंत तरास,प्रकाश पांडे अशोक टावरी,विनोद भगत,उत्तम जुगनाके, ज्ञानेश्वर कुंड,मोहन जोशी,शैलेश पाळेकर,यांच्या सह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.यावेळी विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.