समुद्रपुर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट युवक कार्यकर्ता मेळावा जाम येथे संपन्न संपन्न…

0

🔥समुद्रपुर तालुक्यातील हजारो युवकांची उपस्थिती.

हिंगणघाट -/ आगामी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या संदर्भाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ( शरदचंद्रजी पवार गट ) समुद्रपुर तालुका शहर व ग्रामीण युवक कार्यकर्ता मेळावा दिनांक 18/08/2024/ रोज रविवार वाजता हॉटेल अशोका, जाम येथे आयोजित करण्यात आला
युवा नेते डॉ निर्मेश कोठारी
संचालक कृ.उ.बा.समिती हिंगणघाट
युवा नेते गौरव तिमांडे यांचे नेतृत्वाखाली हा मेळावा घेण्यात आला होता.राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक मेळाव्याला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला.
शेकडो युवकांनी डॉ निर्मेश कोठारी व गौरव तिमांडे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात प्रवेश केला .
युवक मेळाव्याला संबोधित करताना तडफदार युवा नेते डॉ निर्मेशजी कोठारी यांनी *लढेंगे भी जितेंगे भी* या ध्येयासह हिंगणघाट विधानसभा मतदारसंघ काबीज करण्याचे आवाहन केले तसेच पक्षाच्या अडचणीच्या काळातही पक्षनिष्ठा न सोडणा-या सर्व युवकांचे आभार मानले. मेळाव्यात बोलतांना युवा नेते गौरव तिमांडे यांनी मोठ्या ताकदीने विधानसभा खेचून आणण्याचे आवाहन उपस्थित युवकांना केले.
याप्रसंगी समुद्रपुर तालुक्यातील हजारावर युवकांची उपस्थिती होती
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हेमंत पाहुणे यांनी तर आभार प्रदर्शन आशिष चतुर यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रामुख्याने महादेव बादले नगरसेवक समुद्रपुर, हेमंत पाहुणे संचालक कृ उ बा स, सचिन तुळनकर, मनीष गांधी, सौरभ साळवे, अनिकेत कांबळे, धनंजय बकाने माजी नगरसेवक, दिपक माडे, विक्की वाघमारे , लीलाधर मडावी, शेरा, विक्रांत भगत, सलमान शेख, गौरव घोडे, पंकज धवणे, पंकज पाके, हुसेन खान, वृषभ राऊत, अमित लाजूरकर, अमर झाडे, रणजीत चावरे, महेंद्र शिरोडे, सतीश चतुर, आशिष चतुर, निषाद बोरकुटे, संजय तुराळे, रामदास उमरेडकर, संदीप झाडे, सचीन चतुर, युवराज तांदुळकर ,अमोल सुमटकर , सौरभ तुपे, पवन मुडे, , विलास पानसे , संदीप डंबारे , ईश्वर डंबारे, गजानन निघोट, पांडुरंग किटे, रवी शेंडे, राजकुमार इंगोले इत्यादी पक्षाच्या युवक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अतिशय मेहनत घेतली.

ईकबाल पहेलवान साहसिक news-24 हिंगणघाट 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!