संत्रा मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांचा मोर्चा धडकताच तहसीलदार यांनी दीले पंचनामे करण्याचे आदेश…..

0

साहुर,आष्टी -/ तालुक्यातील संत्रा मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांनी आक्रोश मोर्चा काढून तहसीलदार यांना निवेदन दिले की जुलै व ऑगस्ट या महिन्यात अतिवृष्टी व सतत झालेल्या पावसामुळे येथील मोसंबी व संत्रा आंबीयाबाराची फळगळ अतोनात झालेली असल्यामुळे येथील प्रत्येक शेतकऱ्याचे हेक्टरी पाच लाख ते सहा लाख रुपयाचे नुकसान झालेले आहे सदर तालुका मोसंबी व संत्रा या दोन्ही पिकांनी जास्त प्रमाणात व्यापलेला आहे त्यामुळे येथील शेतकऱ्यांचे उपजीविकेचे साधन मोसंबी व संत्रा पिकावरच अवलंबून आहे फळगड झाल्यामुळे शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आलेली आहे या तालुक्याला लागून असलेल्या अमरावती जिल्ह्यातील वरुड व मोर्शी तालुक्यामध्ये मदत मिळालेली आहे सदर आष्टी तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे ही खेदाची बाब असून सर्रास अन्याय होत असल्याचे या निवेदनात म्हटले आहे येथील शेतीचे क्षेत्र हे ओलीताचे असल्यामुळे मोसंबी व संत्रा वर लागणारा शैक्षणिक रोजगार हमी कर सुद्धा भरत आहे तरी आपण आपल्या स्तरावरून आष्टी तालुक्यातील सर्व मौजाचे पंचनामे करण्याचे आदेश द्यावे तसेच आष्टी तालुक्यातील मोसंबी संत्रा शेतकऱ्यांना हेक्टरी पाच लाख रुपये मोबदला देण्यात यावा तसेच नुकसान भरपाई न मिळाल्यास सर्व शेतकरी पाच सप्टेंबर 2024 पासून बस स्टॉप साहूर येथे प्रथम साखळी उपोषण नंतर आमरण उपोषणाला बसणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे निवेदनाची तेव्हाच दखल घेत तहसीलदार यांनी उद्यापासूनच नुकसान झालेल्या फळपीकाचे पंचनामे करणार असल्याचे सांगितले त्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले व सुमित दादा वानखडे यांनी सुध्दा तहसीलदार यांच्यासोबत चर्चा केली निवेदन देते वेळी आष्टी तालुक्यातील शेतकरी सुरेश मुंदाने, ईश्वर राऊत, हरीश लाड, त्र्यंबकराव भोरे ,सुधाकर मुंदाने ,प्रवीण टापरे, स्वप्निल नवरंग ,विजय गावंडे ,सचिन मुंदाने , बाबाराव गावंडे, नरेश मुंदाने ,राजेश वरकड , अनुप गोहत्रे ,मंगेश गोमासे ,नंदलाल नवरंग ,स्वप्निल नवरंग, सुरेश टरके, मंगेश गोमासे, भूषण घोटकर, सोमेश्वर गोहत्रे ,विनय तळहांडे ,रमेश मसरे, हर्षल वाघ, शैलेश घोटकर, प्रशांत काकपुरे, इत्यादी हजारो शेतकरी उपस्थित होते.

शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनाची दखल घेत मी आजच महसूल कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांची मिटिंग घेऊन उद्यापासून पंचनामे करण्याचे सांगतो तसेच प्रत्येक गावांमध्ये जाऊन तीन ते चार दिवसांत कर्मचारी पंचनामे करतील व नंतर सर्व अहवाल वरिष्ठांकडे पाठवतो
तहसीलदार,आष्टी तहसील कार्यालय

शरद वरकड साहसिक news-24 साहूर आष्टी 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!