🔥संतप्त शेतकऱ्यांनी दिली कृषी अधिकारी कार्यालयावर धडक.🔥बनावटी तन नाशक विक्री करणाऱ्या वर कारवाई करा, शेतकऱ्यांनी केली मागणी.🔥थेट शेतकऱ्यांनी उचलला प्रयोग शाळे च्या निर्णयावर प्रश्नार्थक चिन्ह.
आष्टी शहीद -/सततच्या पावसाने शेतात मोठ्या प्रमाणात तन वाढले जाते पण नियंत्रणा करिता अनेक शेतकऱ्यांनी तणनाशकाची फवारणी केली आहे तननाशकाची फवारणी केल्याने तब्बल दीडशे एकरातील सोयाबीन करपून नष्ट झाल्याचा प्रकार तालुक्यातील खडकी किन्हा ळा या गावात घडला आहे सदर प्रकारामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी यांना आर्थिक संकटातून काढण्याचा मार्ग करण्याऐवजी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बळगा ठेवून शेतकऱ्यांना कारवाई सुरू असल्याचा दिलासा तर देत नाही ना,या प्रकरणात खडकी किन्हाळा येथे तालुकास्तरीय कृषी विभागाच्या समितीने भेट देऊन शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या व टूसावा कंपनीचे क्युरॉन नावाची औषधीचे सॅम्पल नमुन्या करिता घेतले होते व ते पाठविण्यात आले होते परंतु कृषी अधीक्षक यांनी काही अधिकारी व कर्मचाऱ्यांना गैरहजर असल्याचा टपका ठेवून कारवाई सुरू आहे तुम्ही शांत रहा असं शेतकऱ्यांना सांगितले परंतु 2017 च्या शासन निर्णयानुसार तालुकास्तरीय समितीमध्ये उपविभागीय कृषी अधिकारी हे अध्यक्ष असते सदस्य सचिव कृषी अधिकारी पंचायत समिती आष्टी व सदस्य सेल्सुरा चे विज्ञान शास्त्रज्ञ सदस्य व तालुका कृषी अधिकारी व त्यासोबत महाबीजचे प्रतिनिधी या समितीत असते या सर्वांनी या शेतकऱ्यांच्या शेतात भेटी देऊन कारवाई केली असता काही अधिकारी व कर्मचारी गैरहजर असल्याचा दिखावादाखून शेतकऱ्यांना दिलासा दिला या प्रकरणात गैरहजर असलेले जिल्हा कृषी अधिकारी श्री बमनोटे यांना विचारणा केले असता त्यांनी स्पष्ट सांगितले आहे की सदर विषय हा गंभीर असून या विषयांमध्ये तालुका कृषी अधिकारी श्री कुंभारे यांना 12 ऑगस्ट 2024 ला पत्रानुसार कळविले आहे की प्रकरणाचे गांभीर्य घेऊन चौकशीनुसार कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करावे परंतु कृषी अधिकारी यांनी गेल्या दहा दिवसात काहीच केल्याचे दिसत नाही त्याचप्रमाणे उपविभागीय कृषी अधिकारी आर्वी यांनी या प्रकरणात गांभीर्य न घेता कारवाईच्या अहवालावर स्वाक्षरी न केल्याचे माहिती मिळतात लोकसभा नेते सुमित वानखडे यांनी याकडे लक्ष देतात पूर्ण शासकीय यंत्रणा शेतकऱ्याच्या या प्रकरणात कामी लागली
शेतकऱ्यांच्या या प्रकरणात कृषी विभाग योग्य मार्गावर न चालता आपल्याच विभागाचे कपडे फाडण्याच्या मार्गावर आहे शेवटी शेतकऱ्यांच्या पदरी निराशास पडणार का हा प्रश्न निर्माण झालेला आहे. एखाद्या औषधी मुळे एक नाही तर दोन जागी दीड दीडशे एकर शेती खराब होत असेल तर शंभर टक्के औषधी दोषी आहे अशा कंपनीचे महाराष्ट्रात विक्री बंदचे आदेश देऊन यांना हद्दबाहेर करावी अशी मागणी आमच्या व्यवसाय संघाने केलेली आहे सोनू उर्फ नरेश भार्गव तालुका अध्यक्ष कृषी व्यवसाय संघ