विद्यार्थांना दिले योगाभ्यासाचे धडे,युगग्रंथ ग्रामगीता तत्वप्रणाली चे मार्गदर्शन…..

0

समद्रपूर -/ जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा,दहेगाव ( समुद्रपूर ) येथे विद्यार्थ्यांना योगासनाचे धडे देऊन औचित्यपर वं. राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या युग ग्रंथ ग्रामगीता तत्वप्रणाली वैचारिक विचाराची सांगड घालण्यात आली.वर्धा येथील जेष्ट योगगुरु दामोदर राऊत ( पतंजली योग समिती, वर्धा ) यांनी सविस्तर योगाचे महत्त्व विशद केले.माणसाला शारीरिक,मानसिक स्वास्थ देणारा योगा हा सहज सोपा दैनंदिन व्यायाम असून निरोगम आयुष्य जगण्यासाठी गरजेचा आहे.योगातील आसन व प्राणायाम यांच्या अभ्यासाने केवळ शरीरालाच नव्हे; तर मनालाही शिस्त लागते.दामोदर राऊत यांनी विद्यार्थ्यांना प्रार्थना व बालगीत सुमधुर गाऊन;वेळप्रसंगी तसेच नृत्य करून घेतले.योगाला मनोरंजनाची जोड दिल्याने विद्यार्थ्यांमध्ये अधिक उत्साह या प्रसंगी आवर्जून दिसून आला.वं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांचा प्रसार व प्रचार करणारे बा. दे.हांडे (जेष्ठ प्रचारक गुरुदेव सेवा मंडळ,वर्धा ) यांनी आपल्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांना तुकडोजी महाराजांनी आपल्या गद्य-पद्य साहित्य लेखणीतून खंजिरी या वाद्याच्या साह्याने भजनाच्या माध्यमातून परंपरागत अनिष्ट रूढी-जाती-धर्म-पंथ भेद, अंधश्रद्धा, अस्पृश्यता. विविध अशा घातक समाज रुढींवर कठोर प्रहार करून समाज जागृतीचे शेवटच्या स्वासापर्यंत कार्य केले.हांडे यांनी तुकडोजी महाराज रचित (भक्ति नव्हे माझे रडणे दुःखाचे तुझ्या विरहाचे ओढे येती |हा सुमधुर अभंग सादर केला.या कार्यक्रमात शाळेचे मुख्याध्यापक हस्तलिखितकार धनंजय नाखले यांनी आपल्या मार्गदर्शनात सुबक अक्षर कसे काढावेत ? व विद्यार्थ्यांनी अभ्यासाचे नियोजन कसे करावे ? यावर भर दिला.सतीश बाभुळकर यांनी आपले विचार मांडले.तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहअध्यापक  विजय सुरकार यांनी केले व आभार प्रदर्शन श्रीमती. दिपाली बोचरे यांनी केले.व्यवस्थापन समिती अध्यक्ष  भोजराज उईके,सदस्य विठ्ठल किनेकर, वसंतराव अवघडे यांची उपस्थिती होती.व गावातील नागरिकांनी या कार्यक्रमात उत्साहाने भाग घेतला.

गजानन जिकार साहसिक news-24 तुळजापूर,समुद्रपूर 

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!