एका गावगुंड दारू विक्रेत्याने घरात घुसून केली मुलीची छेडखानी…

0

🔥हाच तो शहरातील गुंड प्रवृत्तीचा दारू विक्रेता व मुलीची छेडखानी करणारा जावेद शेख देवळी पोलिसांच्या जाळ्यात.🔥विश्व हिंदू बजरंग दल परिषद व शिवसेना देवळी पोलीस स्टेशनला दिले निवेदन.

देवळी -/ शहरातील आरोपी गावगुंड व दारू विक्रेता जावेद शेख या गावगुंडाणे सायंकाळच्या वेळेला मुलगी एकटी घरी असल्याचे पाहून घरात घुसून छेडखानी करून तिला धमकी देत समंध प्रस्तावित करण्याचा प्रयत्न केला.मात्र मुलीने आरडा ओरड केल्यावरून आरोपी जावेद शेख याने पळ काढला आई-वडील बाहेरून आल्यावर मुलीने मात्र घडलेला प्रकार आई-वडिलांना सांगितला असता तात्काळ आई-वडिलांनी पोलीस स्टेशन गाठले व तक्रार नोंदवली व देवळी पोलिसांनी तात्काळ आरोपीचा शोध घेत आरोपी जावेद शेख याला अटक केली.पोलिसांनी २७ ऑगस्ट रोजी तक्रार नोंदवलेली आहे तसेच या आरोपी जावेद शेख च्या विरोधात देवळीतील बजरंग दल विश्व हिंदू परिषद या कार्यकर्त्यांनी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन त्वरित कडक कारवाई करण्याची मागणी केली आरोपी हा दारू विक्रेता असून,गावगुंड म्हणून प्रसिद्ध आहे,सदर आरोपी जावेद शेख हा शहरामध्ये दुचाकी वाहन वेगाने चालवणे,मुलीची छेडखानी करणे,धमक्या देणे,व शहरातील दहशत माजवणे,हा त्याचा नित्य नियम झालेला आहे.शाळा सुटल्यावर विद्यार्थिनींना रेटून जाणे,त्यांच्या जवळून गाडीने धक्के देणे,असले प्रकार नित्य नियमाने होत असल्याचे निवेदनातून सांगितले आहे. (हाच तो आरोपी जावेद शेख शहरातील दारू विक्रेता व गावगुंड प्रवृत्तीचा मुलीची छेडखानी करणारा.)

त्यानुसार देवळी पोलीस स्टेशन अंतर्गत ७४२,२४ कलम ७८,३२९, (४)B N S कारवाईस या गुन्हे अंतर्गत आरोपीला अटक करण्यात आले व आरोपीला आज २८ ऑगस्ट रोजी आरोपी जावेद शेख याला पोलीस कस्टडी रवाना करण्यात आले.तसेच
पुढील तपास (P S I गजभिये,A S I किशोर साखरे पुढील तपास करीत आहे.तसेच जावेद शेख हा वेगाने गाडी चालवत असल्यामुळे रस्त्याने जात असलेले मुलं बाळ गाडीमध्ये सापडून जीव जाण्याची शक्यता निर्माण होत असल्याचा पालकांमध्ये चिंतेचे वातावरण सध्या गावात असल्याचे चर्चा आहे.छेडछानीचे व बलात्काराचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने सदर आरोपीवर कडक कारवाई करण्यात यावी अशी विश्व हिंदू परिषद बजरंग दल व शिवसेना कडून अशी मागणी निवेदनातून करण्यात आलेली आहे.निवेदन देते वेळी गोल्डी बग्गा,संजय कामडी, प्रवीण तेलरांधे,गजानन महल्ले,मोहन जोशी,सुहास कुरटकर,महेश जोशी, स्वप्नील भगत,पवन जगताप,सौरभ क्षीरसागर,सुरेश वैद्य,मोहन इंगोले,अजय देशमुख,लक्ष्मण वैद्य,आदींचा समावेश होता.(क्रमशः)

सागर झोरे साहसिक news-24 देवळी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!