🔥आर्वी येथे वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश न्यायालयाच्या (वरिष्ठ स्तर) स्थापनेस राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी.
🔥सुमित वानखेडेंनी केलेल्या प्रयत्नांना यश
आर्वी -/आष्टी, कारंजा तालुक्यातील वकिल मंडळींना तसेच पक्षकारांना कोर्टाच्या केसेस साठी आता वर्धेला जायची गरज राहणार नाही. त्याबाबतचा निर्णय महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने घेतला असून आता आर्वी येथे वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश न्यायालयाच्या (वरिष्ठ स्तर) स्थापनेस राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असल्याची माहिती सुमित वानखेडे यांनी देत आर्वी, आष्टी, कारंजा बार असोसिएशनचे मनःपूर्वक अभिनंदन केले. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार त्यांनी मानले आहे. सोबतच सर्व वकिलांनी आर्वी येथे सीनियर डिव्हिजन कोर्ट स्थापित व्हावे म्हणून पाठपुरावा केल्या बद्दल त्यांचेही आभार सुमित वानखेडे यांनी व्यक्त केले.आर्वी, आष्टी व कारंजा तालुक्यातील वकिलांना कोर्ट केस संदर्भात वारंवार वर्धेला जावे लागत होते. त्यामुळे वकिल व पक्षकारांचा वेळ, श्रम आणि पैसा वाया जात होताच सोबतच संपूर्ण दिवस जात होता. त्याने पक्षकारांना महत्वाचे काम सोडून पहिले वर्धा गाठावी लागत होती. त्यामुळे सन २०१९ पासून बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी आर्वी येथे वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश न्यायालयाचे कोर्ट व्हावे यासाठी सुमित वानखेडे यांना मागणी केली होती. त्या अनुषंगाने मागणीच्या आवश्यकतेची संपूर्ण तांत्रिक माहिती घेतल्यावर मागणीची पूर्तता करून घेण्यासाठी प्रयत्न केले होते. नागपूर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनात बार असोसिएशनचे पदाधिकारी आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट घडवून आणुन देत निवेदन दिले होते.संपुर्ण तांत्रिक पाहणी अहवाल सादर झाल्यावर मंत्रिमंडळाने न्यायाधीश न्यायालयाच्या वरिष्ठ स्तराला मंजूर दिली आहे. त्यामुळे सुमित वानखेडे यांनी आर्वी च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा मिळवून दिला आहे असे म्हणत वकिलांच्या प्रलंबित मागणीला प्रत्यक्ष यश मिळवून दिले या बद्दल सर्व वकिलांनी त्यांचे आभार मानले आहेत. आर्वी येथे सीनियर डिव्हिजन कोर्ट स्थापित होणार याची खबर लागताच आर्वी मतदारसंघातील आर्वी, आष्टी व कारंजा तालुक्यातील नागरीकांनी सुमित वानखेडे यांचे कौतुक करत आभार मानले आहेत. असेच निरंतर मतदारसंघाचा विकास सुमित वानखेडे करतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे.