अवैध मुरम उत्खनन करणाऱ्या वर कधी होणार कारवाई?…

0

🔥महसूल विभाग व मुरूम तस्करांच्या साटेलोट मुळे होत आहे अवैध मुरम उत्खनन.

🔥सोनेगाव केळापूर रस्त्यावर होणाऱ्या अवैध मुरम उत्खननावर महसूल विभागाची कारवाई करण्यास टाळाटाळ.

देवळी -/ तालुक्यातील सोनेगाव (आबाजी) केळापूर रस्त्यावरील डिमालेशन गेट जवळ मागील अनेक दिवसांपासून दिवस ढवळ्या जेसीपी,टिप्पर,ट्रॅक्टर,व जेसीपी ने अवैध मुरम उत्खनन करून टिप्पर, ट्रक,ट्रॅक्टर,च्या माध्यमातून अवैध मुरमाची भर दिवसा तस्करी केल्या जात आहे.अगदी रोडालगत हे अवैध मुरूम उत्खनन सुरू असून तरीही महसूल विभाग याकडे हे तू परस्पर दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे.
या अवैध मुरम उत्खननाच्या वाहतुकीमुळे सोनेगाव केळापूर मार्गाची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे.शेतकरी व या मार्गावर वाहतूक करणाऱ्या नागरिकांना अत्यंत त्रास सहन करावा लागत आहे.याविषयी देवळी तहसील कार्यालयावर महसूल विभागात विचारपूस केली असता हो बघू पाहतो करतो अशी उडवा उडवी ची उत्तरे देण्यात आली.हे अवैध उत्खनन देवळी तालुका व वर्धा तालुका या दोन्हीही तालुक्याच्या सीमा रेषेवर होत आहे या वर्धा आणि देवळी तालुक्याला या अवैध मुरम उत्खननामुळे या भागातील शेतकरी व नागरिक त्रस्त झालेले आहेत.वर्धा व देवळी तालुक्यातील महसूल विभाग कुंभकर्णी झोपेतून कधी जागा होईल अशी चर्चा या भागातील नागरिकांमध्ये सुरू आहे.
अवैध मुरम उत्खनन करणाऱ्या शेतामध्ये अजूनही मोठ-मोठे खड्डे आहेत तरीही त्या शेत मालकाला विचारपूस का होत नाही त्याला परवानगी कोणी दिली याची माहिती महसूल विभाग का घेत नाही तसेच कायदेशीर रित्या अवैध मुरम उत्खनन करणाऱ्या वर कारवाई का करत नाही असे प्रश्न आता या भागातील नागरिक करू लागलेले आहे तरी महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या अवैध मुरूम उत्खनन करणाऱ्या तस्करांवर कायदेशीर कारवाई करावी तसेच या अवैध मुरम तस्करांना अभय देणाऱ्या तालुक्यातील महसूल अधिकाऱ्यांवरही चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी या परिसरातून नागरिक करीत आहे.

                                    (क्रमशः)

सागर झोरे साहसिक news-24 देवळी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!