आष्टीत संत्रा-मोसंबीच्या मोबदल्यासाठी शेतकऱ्यांचे उपोषण सुरु…..

0

आष्टी (शहीद) -/ तालुक्यातील अनेक गावांत यावर्षी अतीव्रृष्टी व सततच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात संत्रा आणि मोसंबी ची गळ झाली.यामध्ये संत्रा-मोसंबीची ७० ते ८० % गळती झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.यामधे शेतकरी हवालदिल झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान भरपाई मिळण्यासाठी आष्टी तालुक्यातील शेतकऱ्यांनी मागील महीन्यात मोर्चा काढला होता.त्या अनुषंगाने तहसिलदार डॉ.हंसा मोहणे यांनी तातडीने तलाठी, कृषी सहाय्यक आणि ग्रामसेवक यांना मौजा निहाय संत्रा – मोसंबी गळतीचा सर्वे करण्याचे आदेश काढले.कर्मचार्यांनी सर्वेक्षण करून याद्या तहसिल कार्यालयात सादर केल्या मात्र संत्रा-मोसंबी ची आर्थिक नुकसान भरपाई मंजुर झाली नसल्याने तालुक्यातील १४ शेतकऱ्यांनी १७ सप्टेंबर २०२४ पासुन आष्टी येथील तहसिल कार्यालया समोर उपोषण सुरू केले आहे.

उपोषणात सावंगा(पु.) चे विद्यमान सरपंच
विनोद सोनोने , बोरगाव (टु.) चे विद्यमान सरपंच संजय ठाकरे , लहान आर्वी चे विद्यमान सरपंच सुनिल साबळे , साहुरचे माजी सरपंच प्रशांत काकपुरे , वडाळाचे माजी उपसरपंच बबन कोहळे यांच्या सह साहुरचे शेतकरी प्रविण टापरे आणि विजय गावंडे , धाडीचे विष्णू चोरे आणि विवेक पाटोडे , माणिवाडा चे सुरेश खवशी , बोरगावचे चेतन लबडे , वडाळा चे मधुकर ,आणि ज्ञानेश्वर भोंड आणि रमेश जोमदे इत्यादी शेतकरी आमरण उपोषणाला बसले आहे.हे सर्व पक्षीय शेतकरी उपोषण असल्याने आष्टी तालुक्यातील सर्व संत्रा आणि मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना शेकडो शेतकरी उपोषण कर्त्यांना पाठींबा देण्यासाठी उपस्थित होते.कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस निरीक्षक सुनिलसिंग पवार व खुपीया नंदकिशोर वाढवे लक्ष ठेऊन आहे.

नरेश भार्गव साहसिक news -24 आष्टी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!