बाळापूर -/अकोला शहरासह तालुक्यातील श्री गणेश मूर्तीचे तालुक्यातील भिकुंडखेड येथील मन नदीच्या घाटावर विसर्जन करण्यात येते. त्यामुळे उपविभागीय अधिकाऱ्यांनी मंगळवार, दि.१६ सप्टेंबर रोजी विसर्जनस्थळी भेट देऊन सोयीसुविधांचा आढावा घेतला. याप्रसंगी शोध व बचाव पथक सज्ज ठेवण्यासाठी संबंधितांना सूचना दिल्या.भिकुंडखेड येथील घाटावर सलग दोन दिवस श्री गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यात येते. त्यामुळे प्रशासनाकडून तयारी सुरू असून, घाट परिसरातील स्वच्छता करण्यात आली आहे. तसेच परिसरात वीजपुरवठा सुरू केला आहे. याप्रसंगी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. बाळापूर शहरासह ग्रामीण भागातील भाविक व अकोला शहरातील भातित श्री गणेश मर्तीत्ने भिकुंडखेड येथील घाटावर १७ व १८ सप्टेंबर रोजी विसर्जन होणार आहे.त्यामुळे स्वच्छता करून बचाव पथक सज्ज ठेवले आहे. मोठमोठ्या गणेश मूर्तीच्या विसर्जनासाठी क्रेनची सुविधा देण्यात आली आहे. गणेश भक्तांनी नदीत खोल पाणी असल्याने पोहणे टाळावे. कुठलीही अनुचित घटना घडल्यास बचाव पथकाला माहिती द्यावी.बाळापूर शहरातील गणेश विसर्जन मिरवणूक मार्गावर व गणेश घाटावर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. हैदाबाद-इंदूर राष्ट्रीय महामार्ग काही काळासाठी बंद राहणार आहे. त्यासाठी पर्यायी मार्ग अकोला नाका ते पारसफाटा महामार्ग या वळण मार्गाचा वापर करावा. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सोयीसुविधांचा आढावा घेण्यासाठी अधिकाऱ्यांनी विसर्जनस्थळाची पाहणी केली. यावेळी उपविभागीय अधिकारी अनिरुद्ध बक्षी, तहसीलदार वैभव फरतारे, ठाणेदार अनिल जुमळे, नायब तहसीलदार सैय्यद ऐसान्नोद्दीन यांची उपस्थिती होती.