वर्धा -/देशातील लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी वृत्तपत्र हा महत्त्वाचा दुवा असतो. म्हणूनच त्याला लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हटल्या जाते. हा स्तंभ बळकट करणारा पत्रकार लोकशाहीचा सजग प्रहरी आहे. मुल्यांशी एकनिष्ठ राहणार्या अशा पत्रकारांचा सत्कार करीत असल्याचा मनापासून आनंद होत असल्याची भावना वाडी न.प.चे मुख्याधिकारी डॉ. विजय देशमुख यांनी व्यक्त केले ते वाडी स्थित शिव इव्हेंट्स च्या स्टुडिओत जाग फाउंडेशन द्वारा आयोजित स्व.पत्रकार सुनील शेट्टी यांच्या स्मृती निमित्त संगीतमय भावपूर्ण आदरांजली कार्यक्रमात बोलत होते.
आयोजक जाग फाउंडेशनचे संस्थापक सौरभ पाटील यांनी कार्यक्रमाच्या आयोजना विषयी माहिती देवून प्रमुख अतिथींचे पुष्पबुके देऊन स्वागत केले.
यावेळी स्व.सुनील शेट्टी यांना सामुहिक आदरांजली वाहण्यात आली.
तद्नंतर डॉ.विजय देशमुख यांच्या हस्ते कोरोना योद्धा पत्रकार विजय खवसे,प्रा. सुभाष खाकसे,भीमराव लोणारे,सुरेश फलके,अरुण कराळे,गजानन तलमले, विजय वानखेडे,नरेशकुमार चव्हाण, दिलीप तराळेकर, विकास बनसोड,ऑंचल लोखंडे, नागेश बोरकर, ऋषीकुमार वाघ, विलास माडेकर, अजय तायवाडे, नटवर अबोटी, समाधान चौरपगार, वाडी न.प. चे कर्तव्यदक्ष लिपिक योगेश जहागिरदार, सिने अभिनेता पराग भावसार, प्रवीण डाखोरे,
इत्यादींचा शाल,श्रीफळ व मोमेंटो देऊन सत्कार करण्यात आला.
पत्रकाराचा सन्मान हा लोकशाहीचा गौरव असल्याचे मत शिव इव्हेंट्स चे संचालक शिवराज सिंग राजकुमार यांनी व्यक्त केले.
संचालन विजय खवसे यांनी तर आभार विजय वानखडे यांनी मानले.
कार्यक्रमाला माजी जि.प.सदस्य दिनेश बन्सोड, भूषण खवसे, सोमनाथ रॉय, प्रफुल सोलंकी, अंकित येनुरकर, शेखर श्यामकुमार, संस्कृती तराळेकर, अर्चना लोखंडे, राजेंद्र वासनिक, राम भजन, निलेश किनकर, राहुल लोखंडे, राहुल बिंड, ज्ञानेश्वर बिडबाईक इं.सह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.