आगामी होणाऱ्या विधानसभेच्या अनुषंगाने सर्वांनी जोमाने कामाला लागा – अतुल वांदिले प्रदेश सरचिटणीस रा.काँग्रेस पार्टी…

0

🔥राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची हिंगणघाट शहर कार्यकारिणी बैठक संपन्न.

हिंगणघाट -/ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची हिंगणघाट शहर कार्यकारिणीची आढावा बैठक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.
आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध विषयांवर चर्चा झाली. स्थानिक साई मंदिर हॉल येथे पार पडलेल्या या बैठकीत कार्यकर्त्यांचे म्हणणे जाणून घेऊन अनेक मुद्द्यावर कार्यकर्त्यांना प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी मार्गदर्शन केले. बैठकीला हिंगणघाट शहरातील सर्व प्रमुख पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांना निवडणुकीच्या अनुषंगाने विविध गोष्टींची माहिती देण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हिंगणघाट शहरात जास्तीत-जास्त मताधिक्य कसे घेईल यावर विचारविनिमय करण्यात आला. सत्तापरिवर्तन घडवून आणण्यासाठी सर्वजण जोमाने कामाला लागण्याचा सूचना प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी दिल्या.

याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्यासह तालुका अध्यक्ष महेश झोटिंग पाटील, अल्पसंख्याक प्रदेश सरचिटणीस हिमायू मिर्झा बेग, युवक प्रदेश सचिव प्रशांत लोणकर, प्रदेश सचिव मोहम्मद अली अजानी, जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे, जिल्हा उपाध्यक्ष राजेश धोटे, शहराध्यक्ष बालु वानखेडे,वाहतूक जिल्हाध्यक्ष शेखर जाधव,अपंग सेल जिल्हाध्यक्ष मारोती महाकाळकर, जावेद मिर्झा,भोला निखाडे, राजू मेसेकर, किशोर चांभारे, अहमद खान पठाण,परम बावणे, कुणाल येसम्बरे,सुभाष सोयाम, बबलू शेख, मोहम्मद शाकिर,विनोद कुटे, साहेबराव येडे,देवा शेंडे,सिमा तिवारी,सुजाता जांभुळकर, दिपाली रंगारी, शितल तिवारी, नीता गजबे,सुचिता सातपुते, शगुप्त शेख,मिना सोनटक्के,विद्या गिरी,मंगला कुमरे, अमिता पुनवटकर, सविता गिरी,आचल वकील,सुनीता तामगाडगे,सुनीता उपासे,विशाखा येलेकर,पुरुषोत्तम कांबळे,सुधाकर वाढई, सिद्धार्थ मस्के,संजय गांभुले, गुड्डू भाई, अशोक वरघणे,घिमेकर गुरुजी, संजय गाभुले, हुकेश ढोकपांडे,सुनिल ठाकरे,ऋषिकेश मेश्राम, गणपत गाडेकर, गणपत ढगे,चेतन काळे, अमित रंगारी,रवींद्र शेंडे यांच्यासह सर्व पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ईकबाल पहेलवान साहसिक news -24 हिंगणघाट 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!