कृषी विभाग कर्मचारी वृंद सहकारी पतसंस्था ची आमसभा, लोकार्पण सोहळा व गुणवंत पाल्याचा सत्कार संपन्न…

0

 वर्धा -/ कृषी विभाग कर्मचारी रुंद सहकारी पतसंस्था द्वारा प्रताप नगर येथे बांधण्यात आलेल्या नवीन इमारत,पतसंस्थेचे नवीन कार्यालय व विद्यार्थ्यांसाठी बांधण्यात आलेल्या अभ्यासिकेचा लोकार्पण सोहळा खासदार अमर बाबू काळे तसेच आमदार डॉक्टर पंकज भोयर यांच्या शुभहस्ते तर शंकर तोटावर विभागीय कृषी सहसंचालक नागपूर, रमेश देशमुख जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी वर्धा, राजेश उंबरकर प्रशासन अधिकारी नागपूर, रामनाथजी खोंडे ज्येष्ठ सभासद, ओमकार धावडे जिल्हा पगारदार पतसंस्था संघ, प्रशांत भोयर अध्यक्ष यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. तसेच पतसंस्थेची 47 वी वार्षिक सर्वसाधारण सभा दाते सभागृहात पार पडली. सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर सभासदांच्या गुणवंत पाल्याचा, सेवा निवृत्त झालेल्या सभासदांचा, 75 वर्ष पूर्ण झालेल्या सभासदांचा, विशेष प्राविण्य प्राप्त पाल्यांचा सत्कार, तसेच अभ्यासिका तयार करण्यासाठी मदत करणाऱ्या दानदात्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. खासदार अमर काळे यांनी पतसंस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या सामाजिक उपक्रमाची प्रशंसा केली…व भविष्यातही पतसंस्थेच्या उपक्रमात स्वतः सहभागी राहणार असल्याचे सांगितले.आमदार पंकज भोयर यांनी पतसंस्थेमार्फत तयार केलेल्या वाचनालकरिता पाहिजे ती मदत करण्याचे जाहीर करून सभासदाव्यतिरिक्त गरीब विद्यार्थ्यांना या वाचनालायचा नक्कीच लाभ होणार आहे असे सांगितले. यानंतर संस्थेचे सचिव मोहीन शेख यांनी संस्थेचा वार्षिक अहवाल, जमा खर्च, संस्थेचा नफा, ताळेबंद व 2024 25 चे अंदाजपत्रक सभा सभासदांपुढे वाचून दाखवले तसेच विविध विषयावर सभासद व संचालक मंडळ यांच्या चर्चा झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष प्रशांत भोयर यांनी तर संचालन सुचिता रायपुरे व रेश्मा बोरले यांनी तर आभार प्रदर्शन गणेश पिवटकर यांनी केले सभेला पूर्ण संचालक मंडळ, संस्थेचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम व आमसभा यशस्वी करण्याकरिता व्यवस्थापक सुनील देवलकर अतुल सगण, मंगेश करलुके यांनी प्रयत्न केले.

गजेंद्र डोंगरे साहसिक news -/24 वर्धा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!