आदिवासी कला व सांस्कृतिक महोत्सव व सामाजिक प्रबोधन मेळाव्यात सुमित वानखेडेंचा सत्कार….

0

आष्टी शहीद -/ तळेगाव येथे गोंडवाना सोशल फोरम,ट्राईबल सेल्फ रिस्पेक्ट मुव्हमेंट व आदिवासी समाज बांधव व्दारा आयोजित आदिवासी कला व सांस्कृतिक महोत्सव व सामाजिक प्रबोधन मेळाव्यात आदिवासी समाजातील बांधवाना त्यांच्या घरकुलाचा प्रश्न मार्गी लावून मुलभूत हक्क मिळवून देण्यासाठी केलेल्या कार्यामुळे सुमित वानखेडे यांचा आदिवासी प्रथेप्रमाणे पारंपरिक पद्धतीने यथोचित सत्कार करण्यात आला.आदिवासी समाजाच्या कला, संस्कृती, साहित्याचे जतन करणे तसेच त्यांच्या शैक्षणिक व आर्थिक उन्नतीसाठी प्रयत्न करण्याच्या उद्देशाने आयोजित या मेळाव्यात आदिवासी संस्कृतीचे खरे दर्शन घडले असे सुमित वानखेडेंनी सत्काराला उत्तर देताना सांगत त्यांनी आयोजकांच्या आयोजनाचे कौतुक केले. मंचावर प्रा. आशिष नरपाचे समाजसेवक, श्यामजी शंभरकर, रमा खंडात, सीमा नामुरते, बाबारावजी धुर्वे माजी बांधकाम सभापती नगरपंचायत आष्टी, रामजी मरसकोल्हे यांची उपस्थिती होती.या मेळाव्याचे प्रास्तविक वैभव पंधराम यांनी केले तर सुरज आत्राम, श्यामजी शंभरकर आणि सुमित वानखेडे यांनी मेळाव्याला संबोधित केले.मेळाव्यात मोठ्या प्रमाणात आर्वी, आष्टी व कारंजा तालुक्यातून आदिवासी समाज बांधवांनी रॅली काढून त्यांच्या एकसंघपणाचे दर्शन घडवले.अतिशय सुंदर नृत्य व कला सादर करित कार्यक्रमाला रंगत आणली होती. रॅलीत आदिवासी बांधवांनी पारंपरिक पोशाख घातले होते. रॅली मध्ये आदिवासी नृत्य आविष्कार सादर केले होते. सुमित वानखेडे आदिवासी समाज बांधवांच्या उत्साहीत जल्लोषात समाज बांधवांची साथ दिली.मेळाव्याचे संचालन विद्या नरड यांनी केले तर आभार प्रदर्शन आकाश श्रीराम यांनी केले. मेळाव्यात आर्वी, आष्टी व कारंजा तालुक्यातील आदिवासी पुरुषांसह महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी नोंदविला.

नरेश भार्गव साहसिक news -/24 आष्टी शहीद 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!