अनेक वर्षे रखडुन असलेले घरकुल पट्टे नियमित करण्यासाठी किसान अधिकार अभियान चा तहसिलदार कार्यालय सेलू वर ठिय्या आंदोलन…..

0

🔥आठ दिवसात सर्वे करून घरकुलाबाबत अहवाल तलाठी सादर करतील व पट्टे नियमित करण्याच्या अडचणी दूर करणार तहसिलदारांचे आश्वासन.

सेलू -/ येथे अनेक वर्षापासून रखडून असलेल्या घरपट्ट्यांच्या मागणीसाठी किसान अधिकार अभियान च्या माध्यमातून सेलू तहसीलदार कार्यालयावर आज दुपारी ठिय्या आंदोलन करण्यात आले.तहसीलदार माननीय वासने शी किसान अधिकार अभियान चे मुख्य प्रेरक अविनाश काकडे व सुदाम पवार,उपाध्यक्ष विठ्ठल झाडे यांनी या मुद्द्यांवर चर्चा

चर्चेच्या अंती घरकुलाच्या संदर्भात पुढील आठ दिवसात संबंधीत गावातून तलाठी , मंडल अधिकारी अहवाल सादर करणार व रीतसर सहभागी असणाऱ्या महिलांना घरपट्टे नावे करून देण्याचे व नियमित घरपट्टे करून देण्याचे काम होणार असे आश्वासन दिले. तसेच झुडपी किंवा वन विभागाच्या अंतर्गत असलेल्या जागांचा खटला सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे, तो निर्णय आल्या नंतर पुढील कारवाई करण्यात येईल. त्याशिवाय आवश्यक असणाऱ्या घरपट्टे धारकांना राज्य शासनाच्या पुढील निर्णयानुसार घरपट्टे मिळू शकतील .

यावेळी ठिय्या आंदोलनाक किसान अधिकार चे मुख्य प्रेरक अविनाश काकडे अध्यक्ष सुदाम पवार उपाध्यक्ष विठ्ठल झाडे सचिव प्रफुल कुकडे संघटक गोपाल दुधाने विधानसभा अध्यक्ष चंद्रकांत ढगे,सोशल मीडिया प्रमुख उमेश नारांजे , प्रा प्रविण भोयर, अभिजीत नाखले, सचिन ढगे , राजू बिडकर , मंगेश शेंडे , प्रफुल खोबे, विशाल कोबे , विठ्ठल गुजरकर , प्रभाकर बजाईत, गणेश सुरकार, शैलेश तेलरांधे, अनिल राऊत, पप्पु कांबळे, छाया बिसेन,कल्पना पारधी, अनुताई भांगे,मंदाताई शिंदे, गिरजा लसवंते, सरस्वती मसराम, छाया कुकुडकर व शेकडो च्या संख्येने किसान अधिकार अभियान चे महिला  पुरूष कार्यकर्ता उपस्थित होते.

चैताली गोमासे साहसिक news -24 सेलू 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!