एसीबीच्या उपअधीक्षक पदी दबंग ठाणेदार धनंजय सायरे

0

 वर्धा -/ आपल्या बेधडक कार्यशैलीमुळे अख्ख्या विदर्भात दबंग ठाणेदार/टायगर अशी ख्याती प्राप्त असलेल्या पोलीस अधिकारी धनंजय सायरे यांची नुकतीच नागपूर येथील एसीबीच्या उपअधीक्षक पदावर नियुक्ती करण्यात आलीयं. त्यांच्या या निवडीबद्दल विविध स्तरावर अभिनंदन होत आहे.नागपूर एसीबीचे पोलीस उपअधीक्षक धनंजय सायरे यांचा मुळ जिल्हा नागपूर आहे. त्यांनी पोलीस दलातील आपल्या कारकिर्दीला गडचिरोली येथे पोलीस उपनिरीक्षक म्हणून सुरुवात केली, त्यानंतर गडचिरोली जिल्ह्यातच बोलेपल्ली, आलापल्ली, अहेरी, जिमलगट्टा, मरपल्ली, रेपनपल्ली, वडसा, प्राणहिता अशा विविध पोलीस ठाण्यात त्यांनी पोलीस उपनिरीक्षक म्हणून चोख कामगिरी बजावली. वर्धा जिल्ह्यातील देवळी तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक पदावरील त्यांची कारकीर्द उल्लेखनीय ठरली होती. त्यानंतर चंद्रपूर शहरातील रामनगर आणि यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथील पोलीस ठाण्याचा कारभार त्यांनी यशस्वीरीत्या सांभाळला. दरम्यान त्यांची यवतमाळ शहर आणि त्यानंतर अकोला शहरातील खदान पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली. याठिकाणी देखील त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा चांगलाच ठसा उमटवला. या कामाची पावती म्हणून त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महाराष्ट्र राज्य मुख्यालयात पोलीस उपअधीक्षक पदी बढती मिळाली. दबंग ठाणेदार अशी ओळख असलेल्या धनंजय म. सायरे यांची आता नुकतीच नागपूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उपअधीक्षक पदी नियुक्ती करण्यात आलीयं. त्यांना पोलीस दलातील उत्कृष्ट सेवेकरिता शासनाने विशेष सेवा पदक, खडतर सेवा पदक, आंतरिक सुरक्षा आणि आंतरिक सेवा पदकाने गौरविण्यात आले आहे.त्यांचं विविध स्तरावर सध्या अभिनंदन केले जात आहे.या आधी सेलू पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस निरीक्षक विलास काळे यांची देखील वर्षभरापूर्वी गोंदिया येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उपअधीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली होती, हे विशेष..!

सचिन धानकुटे साहसिक NEWS -/24 वर्धा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!