🔥3 लाख 15 हजार 500 रुपयांचा ठोठावला दंड🔥हाच तो रेती चोरटा अमोल भिसेवर धडक कारवाईमुळे रेती माफियांचे दणाणले धाबे.🔥कारवाईचे सर्वस्तरावरून कौतुक.
सिंदी (रेल्वे) -/ नजीकच्या वना नदीपात्रातुन उंबरा घाटातून चोरट्या मार्गाने अवैद्यरीत्या वाळूचे उत्खनन करून दिग्रज-सिंदी सीमेवर टिप्परच्या साह्याने वाळूची वाहतूक करतांना येथील कर्तव्यदक्ष नायब तहसीलदार मधुकर ठाकरे यांनी रेती माफियाच्या वाहनावर धडक कारवाई केली. अमोल भिसे (35) राहणार उंबरा तालुका समुद्रपूर जिल्हा वर्धा असे रेती चोरट्याचे नाव आहे. या कारवाईमध्ये नायब तहसीलदार यांनी 3 लाख 15 हजार 500 रुपयांचा दंड ठोठावल्यामुळे रेती माफियांचे धाबे दणाणले असून या धडाकेबाज कारवाईचे सर्वस्तरावरून कौतुक होत आहे.
मागील तीन महिन्यांपासून नजीकच्या वना नदीपात्रावरील उंबरा घाटावरून अवैधरीत्या चोरट्या मार्गाने वाळूची तस्करी सुरू आहे. दिनांक 5 फेब्रुवारीच्या पहाटे 4 वाजताच्या दरम्यान सिंदी-दिग्रज सीमेजवळ येथील नायब तहसीलदार आपल्या सहकाऱ्या समवेत गस्त लावत असतांना MH-32Q-5574 क्रमांकाचा टिप्पर रेतीने भरून वाहतूक करतांना मिळून आला. याप्रकरणी सदर वाहन चालकास नायब तहसीलदार ठाकरे यांनी परवानाबाबत विचारणा केली असता वाहन चालकाकडे कोणत्याही प्रकारचा परवाना मिळून आला नाही. सदर वाहन अमोल भिसे राहणार उंबरा ता. समुद्रपूर जिल्हा वर्धा यांच्या मालकीचे असल्याचे वाहनचालकाने सांगितले. टिप्परमध्ये पाच ब्रास रेती मिळून आल्याने वाहनाचा जप्ती पंचनामा करून पोलीस स्टेशन सिंदी (रेल्वे) येथे जप्त करण्यात आला. याप्रकरणी नायब तहसीलदार मधुकर ठाकरे यांनी 3 लाख 15 हजार 500 रुपयांचा दंड ठोठावला आहे. सदर कारवाईचे सर्वस्तरावरून कौतुक केल्या जात असून या धडक कारवाईमुळे अवैध रेती वाहतूक करणाऱ्या रेती माफियांच्या उरात मात्र चांगलीच धडकी भरली आहे.
ही कारवाई तहसीलदार सेलू रेवैया डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली सिंदीचे नायब तहसीलदार मधुकर ठाकरे, ग्राम महसूल अधिकारी सिंदी (रेल्वे) तिलक चंदनखेडे, ग्राम महसूल अधिकारी जुनोना यांनी केली. यापुढे रेती माफिया अवैद्य रेती वाहतूक करतांना दिसून आल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा कर्तव्यदक्ष नायब तहसीलदार मधुकर ठाकरे यांनी दिला आहे.