हिंगणघाट -/येथे हातचालाखीने ए.टी.एम ची बदली करून ए.टी.एम मधुन पैसे विड्राल करून फसवणुक करणारे अटल गुन्हेगाराना 24 तासांच्या आत अटक करून त्यांचे कडुन नगदी 61,500 गुन्हयात वापरलेली बुलेट 2,50,000 असा एकुन 3.36,500 रु. चा माल जप्त करून पोलीस स्टेशन हिंगणघाट येथील 02 व जिल्हयातील 03 असे एकन 5 गुन्हे उघड अश्या प्रकारचे व ईतर गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता. आहे.
दिनांक 11/02/2025 रोजी फिर्यादी विजय पांडुरंग ढोबळे वय 55 वर्षे रा. संत तुकडोजी वार्ड हिंगणघाट हे त्यांचे वडील नामे पांडुरंग ढोबळे यांना मिळणारे सेवावनिवृत्त पेशनचे पैसे काढण्याकरीता स्टेट बैंक शाखा हिंगणघाट येथे गेले असता अज्ञात आरोपीने फिर्यादीस भैया पैसे जल्दी निकालो असे म्हणुन पैसे काढुन देण्याचा बाहाण करून पिनकोड नंबर प्राप्त करून फिर्यादीचे हातातील ए.टी.एम ची हातचलाखीने अदलाबदली करून ए.टी.एम घेवुन गेला व फिर्यादी याचे वडीलांचे बैंक खात्यातुन ए.टी.एम व्दारे 40,000 रु विड्राल करून फिर्यादी यांची फसवणुक केली अश्या फिर्यादी यांचे रिपोर्ट वरून पोलीस स्टेशन हिंगणघाट येथे अप क 232/2025 कलम 318 (4) भा.न्या.स अन्वये गुन्हा नोंद करून तपासात घेतला.
या अगोदर सुध्दा अश्याच प्रकारचे गुन्हे पो.स्टे ला व जिल्हयात इतर होत असल्याने सदर गुन्हे उघकीस आनुण अज्ञात आरोपीचा शोध घेणे करीता मा. पो.नि श्री गभने सा यांनी केल्याने सदर गुन्हयाचे तपासामध्ये पोहवा नरेंद्र डहाके ब.न 110, जगदिश चव्हाण ब.न 1309 नापोशि विशाल बंगाले 1514 पोशि आकाश कांबळे ब.न 1517 यांनी फुटेजचे सुक्षम तात्रीक निरक्षण करून सपोनि श्री घनश्याम पाटील, पोउनि लक्ष्मीकांत दुर्गे, पोउनि प्रदिप कोल्हे, पोशि अमोल आडे ब.न यांचे सह सदर गुन्हयातील आरोपी नामे 1) मयुर अनिल कायरकर वय 33 वर्षे रा. विश्वकर्मा नगर गल्ली कं 4 नागपुर ह.मु टाटा नगर बेसा रोड नागपुर 2) अभिजीत अनिल गुन्हाणे वय 33 वर्षे रा. श्रीराम नगर दिघोरी रोड उमरेड रोड नागपुर यांना मोठ्या शिताफिने त्यांचे राहते घरून त्यांना ताब्यात घेवुन सोबतच पो. स्टे हिंगणघाट येथे दिनांक 11/12/2024 रोजी घडलेल्या घटने बाबत फिर्यादी यांनी दिंनाक 21/12/2024 रोजी दिलेल्या तक्रारीवरून पो.स्टे हिंगणघाट येथे अप कं. 1686/2024 कलम 318 (4) भा.न्या.स गुन्हा नोंद असुन नगदी 39,000 रू ची अश्याच प्रकारे फसवणुक केल्याचे दोन गुन्हयातील मृद्देमाल आरोपीतांकडुन नगदी 61,500/- रू गुन्हयात वारलेली रॉयल इनफिल्ड बुलेट गाडी कं.एम एच 49 सी. ई 7072 किंमत 2,5000/- रू व दोन मोबाईल किमंत 25,000/- रू असा एकुन जु. की. 3,36,500 रू. चा माल जप्त करण्यात आले असुन पो. स्टे हिंगणघाट येथील दोन गुन्हे उघडकीस आनले तसेच वर्धा जिल्हयातील पोलीस स्टेशन सेलु, वर्धा येथील गुन्हा केल्याची कबुली दिली आहे असे एकुन 5 गुन्हे उघडकीस आनले आहे. व जिल्हयातील ईतर गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
सदरची कार्यवाही ही अनुराग जैन पोलीस अधिक्षक, वर्धा. डॉ सागर रतन कपडे, अपर पोलीस अधिक्षक, वर्धा. रोशन पंडीत उपविभागीय पोलीस अधिकारी सा. हिंगणघाट, मनोज गभने, पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन, हिंगणघाट यांचे मार्गदर्शनात घनश्याम पाटील सहा. पोलीस निरीक्षक हिंगणघाट, तसेच पोउपनि लक्ष्मीकांत दुर्गे पोउपनि प्रदिप कोल्हे पोहवा नरेंद्र डहाके ब.न 110, पो.हवा जगदिश चव्हाण ब.न 1309 नापोशि विशाल बंगाले 1514 पोशि आकाश कांबळे ब.न 1517 अमोल आडे ब.न 1710 यांनी केली आहे.