हिगणघाट -/ शहरातील आजवर बारा हजार घराच्या सांडपाणी वाहून जाणाऱ्या जोडण्या झालेल्या असून अन्य घरातील जे पाणी वणा नदीत जात आहे त्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कडे पत्रव्यवहार करून त्या कामासाठी लागणाऱ्या निधीचे अंदाजपत्रक निधी आल्यानंतर शासनाच्या निधी तून किंवा नपच्या स्वनिधी मधून सदर काम पूर्ण करण्यात येईल असे आश्वासन नप मुख्याधिकारी प्रशांत उरकुडे यांनी एका लेखी पत्रातून शिष्टमंडळाला दिले आहे.
वणा नदीत गावातील दूषित पाणी जात असल्याने नदी प्रदूषित होतं असल्याने वणा नदी संवर्धन समितीने या नाल्यात आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते.
यावर नप मुख्याधिकारी यांनी दि 24 फेब्रुवारीला या संदर्भात एका बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी रुपेश लाजूरकर, माजी नगरसेविका शुभांगी डोंगरे, नितीन क्षीरसागर, देवा कुबडे, सतीश धोबे, अशोक मोरे, सूरज कुबडे, वसंत पाल दीपक जोशी,यांनी नप प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. या प्रदीर्घ चर्चे नंतर या शिष्टमंडळाने नप अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष घटनास्थळी चालण्याचा आग्रह करून या ठिकाणी सदर प्लॅन्ट हा सन 2022 मध्ये आलेल्या पुरामुळे नादुरुस्त झालेला होता. सदर प्लांटची दुरुस्ती 2025 मध्ये झालेली असून आठ दिवसापूर्वी हा प्लॅन्ट सुरु होऊन त्यातून 12 हजार घरातून निघणारे दूषित पाणी या प्लॅन्ट मध्यें येते असून अन्य शहरातील दूषित पाणी हें थेट नदीत जात असल्याचे सिद्ध झाले.या प्लॅन्टची अजूनही बरीचशी किरकोळ कामे बाकी असून ती पूर्ण झाल्या नंतर घाण पाणी शुद्धीकरणप्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी एका पत्रकातून कळविले आहे.
सदर प्लॅन्ट हा पूर्ण क्षमतेने चालविण्याकरीता अंदाजित 60 दिवसाचा कालावधी लागण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केलेली असून या साठ दिवसाच्या कालावधीत शहरातील नाल्याचे पाणी शुद्धीकरण करून वणा नदीत सोडण्यात येईल अशी हमी नप मुख्याधिकारी यांनी एका लेखी पत्रकातून दिलेली आहे.
या साऱ्या प्रकरणातून जीवन प्राधिकरण व नप यांच्यात समन्वय असल्याचा अभाव दिसून येत असून हा प्लन्ट पुढील निधी उपलब्ध झाला तरच सुरु होईल अशी लक्षणे दिसून येत असून सद्यस्थितीत नागरिकांना मात्र दूषित पाणी पिणे नशिबात आहे असे दिसत आहे.
या बैठकीला जीवरक्षक राकेश झाडें,वणा नदी संवर्धन चे अशोक मोरे,पर्यावरण संवर्धन संस्थेचे आशिष भोयर, अपंग संस्थेचे मारोती महाकळकर,माजी नगरसेवक मनिष देवढे, धनराज कुंभारे,तुषार हवाईकर,उमेश डेकाटे व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.