आष्टी शहीद -/महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सरचिटणीस अनंत मोहोड यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन शहीद स्मारक आष्टी येथे करण्यात आले होते.
या रक्तदान शिबिरात ६१रक्तदात्यांनी रक्तदान केले. याप्रसंगी अनंत मोहोड यांनी रक्तदानाचे महत्त्व विशद करताना ते म्हणाले की, रक्तदान हे जगातील सर्वश्रेष्ठ दान असून यामुळे तुम्ही दिलेला रक्ताचा एक थेंब अनेक जीवाचे प्राण वाचू शकतो असे ते पुढे म्हणाले. या शिबिरात ज्या रक्तदात्यांनी रक्तदान केले त्या रक्तदात्याचे मनःपूर्वक आभार मानले.
याप्रसंगी वर्धा जिल्हा काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष चंद्रशेखर जोरे यांच्या पुढाकारामुळे सदर शिबिर यशस्वीरित्या पार पडले.
या शिबिराच्या यशस्वीतेसाठी ऊर्सकमिटी अध्यक्ष शाकीर खान, शेखर केचे, शुभम नागपुरे, मनीष का तोडे, राहुल सावरकर, माजी बालकल्याण सभापती सो बेबी बिजवे जि प वर्धा, सरपंच सौ. उज्वला मुंदाने अंतोरा, प्रवीण केचे, शरद शेंद्रे, अँड. किशोर मथले, नामदेव झांबरे, युवराज राऊत, अमीर शेख, सौ. शालिनी कोडापे, आदींनी अथक परिश्रम घेतले.या कार्यक्रमास गावातील नागरिकाकडून उस्फुर्त असा प्रतिसाद मिळाला.