आष्टी शहीद -/तालुक्यातील सेतू केंद्रात ग्राहकांची व ग्राहकाची व शेतकऱ्यांची उघडपणे लूट होत असल्याचे नागरिकांमध्ये सेतू केंद्रा ऐवजी जुनी पद्धत योग्य होती अशी म्हणण्याची वेळ आलेली आहे शासनाने जनतेचे काम दोन दिवसाचे काम एका दिवसात व पैशाची बचत व्हावी याकरिता सेतू केंद्राची निर्मिती केली. परंतु हे विपरीत झालेले आहे जुन्या पद्धतीत शासकीय कार्यालयातून कोणतीही काम अर्ज करून होत होते परंतु आता सेतू केंद्रातून ऑनलाईन अर्ज करण्याची काही केंद्रात 50 ते 100 रुपये वसूल करतात तसेच मोजणीचे, आखीव पत्रिकेचे, रिनंबरिंग पर्चा या कागदपत्राची सेतू केंद्रामध्ये 150 रुपये घेण्यात येते परंतु आमच्या प्रतिनिधी प्रतिनिधींनी चौकशी केली असता शासकीय दर पेक्षा दुप्पट पैसे घेण्यात येत असल्याचे दिसून आले त्याचप्रमाणे तालुका दंडाधिकारी यांचे आदेशाची सत्यप्रत काढण्याकरिता ओवाचे सव्वा पैसे वसूल करण्यात येत आहे हीच पद्धत जुन्या याच्यात योग्य दरात होत होती म्हणून शासनाने जनतेच्या हिताकरिता उचललेले पाऊल आता जनतेच्या खिशाला कात्री लावत आहे शासनाने सेतू केंद्र सुरू केल्याने शासकीय कर्मचाऱ्यांच्या डोक्यावरील ताण कमी झाले परंतु शासनाने जे सेतू केंद्राचेचालविणारे बेरोजगार युवक आहे त्यांचे पोट भरण्याकरिता जनतेच्या खिशाला कात्रण लावण्याची दिसून येत आहे, गुप्त माहितीप्रमाणे या शेती केंद्रातूनही वसुली करून काही अधिकाऱ्यांना पैसे देण्यात येते अशी माहिती मिळालेली आहे याकडे वरिष्ठांनी लक्ष देऊन शेतू केंद्रावर दरपत्रक लावणे आवश्यक असल्याचे व नागरिकांना पावती देण्याचे नियम लावले पाहिजे त्याचप्रमाणे कार्यालयातील अर्जाद्वारे नागरिकांचे काम व्हावे त्याकरिता सुद्धा आदेश देण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे