🔥यशवंत कन्या शाळा देवळी परीक्षा केंद्रावरील घडलेला प्रकार.
🔥कारवाईस विलंबामुळे पालकांमध्ये रोष.
देवळी -/येथील बुधवारी सकाळी साडेदहा वाजता च्या दरम्यान स्थानिक यशवंत कन्या शाळेच्या दहावीच्या परीक्षा केंद्रावर केंद्र संचालक विश्राम पातोंड यांनी विद्यार्थ्यास मारहाण केल्या प्रकरणी संतप्त झालेल्या पालकाने पोलीस स्टेशनची धाव घेतली होती परंतु केंद्र संचालकाने पोलीस स्टेशन मध्ये लिखित माफीनामा दिल्यामुळे त्यांच्यावर फौजदारी कारवाई टळली.
परंतु परीक्षार्थी विद्यार्थ्यांचा कोणताही गुन्हा नसताना त्याला कॉलर पकडून परीक्षा केंद्रावर सगळ्यांसमोर मारहाण करणे ही बाप शिक्षक पेक्षाला ला काळीमा फासणारी आहे. ही घटना चार दिवस लोटून सुद्धा विद्यार्थ्यास मारहाण करणाऱ्या केंद्र संचालकावर अजून पर्यंत कोणतीच कारवाई झालेली नाही त्यामुळे परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा पालक वर्गात रोष निर्माण झालेला दिसतो याप्रकरणी शिक्षण विभागाने त्वरित चौकशी करून विद्यार्थ्यास मारहाण करणाऱ्या केंद्र संचालकावर त्वरित कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी सर्वसामान्यांमध्ये जोर धरत आहे. ———————— परीक्षा केंद्रावर सार्वजनिक ठिकाणी सर्वांसमोर विद्यार्थ्यास मारहाण करणे शिक्षक पेशाला ही लाजिरवाणी बाब आहे अशा शिक्षकावर शासनाने त्वरित कायदेशीर कारवाई करावी आणि विद्यार्थ्याला न्याय द्यावा. सुहास कुरडकर.शिवसेना तालुका प्रमुख( शिंदे गट ) ————————— परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यास मारहाण करणे अपमानास्पद वागणूक देणे हे परीक्षार्थी विद्यार्थ्याचे मनोबल तोडण्यासारखे आहे अशा शिक्षकावर त्वरित कायदेशीर कारवाई करावी जेणेकरून पुढे भविष्यात अशा घटना घडायला नको याकरिता कायदेशीर कठोर कारवाई करणे गरजेचे आहे. गजानन महल्ले.सामाजिक कार्यकर्ता ——————————— विद्यार्थ्याला मारहाण प्रकरणी आम्ही चौकशी करण्यास सुरुवात केली आहे लवकरच चौकशी पूर्ण करू वरिष्ठ अधिकाऱ्यांना अहवाल पाठविणार आहे कारवाईचा निर्णय वरिष्ठ अधिकारी घेतील मला कारवाईचा अधिकार नाही. राजेश रेवतकर.गटशिक्षण अधिकारी पंचायत समिती देवळी