सेवाग्राम -/वर्धा मार्गावरील दुतर्फा मोठ्या प्रमाणावर वाळलेली कडूनिंब आणि अन्य झाडे आजही उभी आहेत.धोकादायक असल्याने ते तात्काळ काढून टाकण्यात यावी यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता चे कनिष्ठ अभियंता कुंजन सावरकर यांना दिनांक ६ मार्च रोजी सेवाग्राम व वर्धा येथील सृजान नागरिकांनी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.सेवाग्राम वर्धा हा महत्वाचा मार्ग आहे.गांधीजींच्या काळात या मार्गावर दुतर्फा कडूनिंब,शिरस,पिंपळ,वड इ.झाडे लावली आणि विपरित परिस्थितीत ती वाढवली.आज जी झाडे ती बहुतांश त्या काळातीलच.विकासाचे वारे वाहायला लागले.रस्ता रूंदीकरणात बहुतांश झाडे तोडे तोडण्यात आली आणि काही रस्त्याच्या खोदकामात वाळून गेली.आजही ही झाडे उभी असल्याचे दिसून येते.काही झाडे वाळत असून यात सर्वाधिक ही कडूनिंबाची आहे हे विशेष.मेडिकल चौकात असेच एक झाड कोडमोडून पडले.दोनदा झाडांच्या फांद्या रोडवर पडल्या पण सुदैवाने प्राणहानी झाली नाही.दै.लोकमतने या बाबत सविस्तर वृत्त प्रकाशित केले होते.काढण्यात येईल असे तोंडी उत्तर देण्यात आले पण अद्यापही झाडे तोडण्यात आलेली नाही हे विशेष.ही झाडे काढून संभाव्य धोका टाळावी अशी मागणी निवेदन देताना अनिल देवतळे,अरून मोरे,प्रा.उमाकांत डुकरे,मुन्ना शिंदे, राजेश वाकडे, दिलीप चव्हाण,शैलजा साळुंखे,देवयानी ढोबले हे उपस्थित होते. तसेच निवेदनावर नामदेव ढोले, सचिन हुडे,दिलीप पाटिल,संगिता चव्हाण,देवयाणी ढोबळे,सिध्देश्वर उमरकर,मिलीन जामणकर,सुनिल ठाकरे,सुषमा काणारे,सुनिल म्हसके अलका पडोळे,बाबाराव वाघमारे.ई.च्या सह्या आहेत.