आष्टी शहीद -/तालुका मोठ्या प्रमाणात जंगल परिसर असल्याने याच परिसराला बहुतांश गावे लागलेली आहे. काही तर अति डोंगराळ भागात वसल्याने या ठिकाणी नेहमीच वाघांचा वावर असते.सविस्तर वृत्त असे की आष्टी तालुक्यातील शेवटच्या टोकाला असलेले बेलोरा,(बू,) येथील अंकुश गंगाधर जाणे यांचे गावालगत शेजारी गोठा असल्याने या गोठ्यामध्ये पाळीव जनावरे गाय वासरू राहत असतात दिनांक सात मार्च मध्यरात्री दरम्यान वाघाने गोठ्यात जाऊन वासरावर हल्ला चढवला या हल्ल्यात वासरू जागीच ठार झाले सदरची घटना सकाळी अंकुश जाणे गोठ्यावर गेला असता उघडकीस आली. यामध्ये या अंकुश जाणे शेतकऱ्याचे नुकसान झाले असून परिसरात या वाघाची दहशत असल्याने शेतकरी वर्ग भयभीत झाला आहे.