हिंगणघाट गुन्हे प्रगटीकरण पोलिसांची मॅफेड्रान विकणाऱ्यावर कारवाई….

0

हिंगणघाट -/ येथील सपोनि अनिल आळंदे सा. व गुन्हे प्रगटीकरन पथकाचे अंमलदार हे पोस्टे परिसरात रात्र गस्त पेट्रोलिंग करीत असतांना मुखबिर कडुन खात्रीशीर खबर मिळाली की,‘ नुतन कन्या शाळा, रामनगर वॉर्ड हिंगणघाट येथील शाळेचे ग्राउड मध्ये स्वागत यादव रा. रामनगर वार्ड, हिंगणघाट हा त्याचेजवळ मॅफेड्रान नावाचा मनोव्यापारावर परिणाम करणारा पदार्थ विक्री करण्याचे उद्देषाने बाळगुण विक्री करीत आहे , अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने सदर माहीती मा. उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडित सा. व मा. पोलीस निरीक्षक देवेंद्र ठाकूर सा. यांना देवून त्याचे आदेशाने नुतन कन्या शाळा हिंगणघाट येथे पोस्टाँप सह रवाना होवून नुतन कन्या शाळा, हिंगणघाट येथील ग्राउड परीसरात येवुन पाहणी केली असता खबरेप्रमाणे शाळेच्या इमारतीचे पायऱ्यावर बसून एक ईसम डिझाईन चे शर्ट व निळ्या रंगाचे जीन्स पॅन्ट घालून शाळेचे पायरीवर बसून दिसुन आल्याने पंचासमक्ष सापळा रचून सदर इसमांस ताब्यात घेवून त्याचे नाव, पत्ता, विचारले असता स्वागत दुर्गाप्रसाद यादव वय 24 वर्श रा. रामनगर वार्ड, हिंगणघाट .जि. वर्धा असे सांगीतले. पंचासमक्ष त्याची कायदेशीर रित्या अंगझडती घेतली असता त्याचे अंगझडतीमध्ये 1) एका प्लॅस्टीकच्या पन्नी मध्ये मॅफेड्रान नावाचा मनोव्यापारावर परिणाम करणारा पदार्थ भरून त्याचे एकुण ल्पॅस्टीक पन्नीसह वजन 5.89 ग्रॅम 2) विक्रीचे नगदी 2920 रू. 3) एक इलेक्ट्रॉनिक डिजिटल वजन काटा की 1000 रू असा एकुण जुमला किंमत 27,800/- रू चा माल मिळुन आल्याने पंचासमक्ष जप्ती पंचनामा कार्यवाही करून सदर माल जप्त करून आरोपीविरूध्द एनडीपीएस अँक्ट कायदयान्वये गुन्हा नोंद करण्यात आला. ही संपूर्ण कार्यवाही मा.पोलीस अधीक्षक अनुराग जैन साहेब, मा.अप्पर पोलीस अधीक्षक डाँ. सागर कुमार कवडे साहेब, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडीत सा. निर्दशानुसार मा.देवेंद्र ठाकूर , पोलीस निरीक्षक सा. हिंगणघाट यांचे आदेशाने पोलीस स्टेशन हिंगणघाट येथील सपोनी अनिल आळंदे सा. यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शनात डि.बी. पथकाचे पोलीस हवालदार प्रशांत ठोंबरे, पोना राहुल साठे , पोना विवेक वाकडे, पोशी आशिष नेवारे,पो.शि. विजय काळे, पोशी मंगेश वाघमारे यांनी केली. सदर गुन्हयांच पुढील तपास हिंगणघाट पोलीस करत आहे.

ईकबाल पहेलवान साहसिक News-24 हिंगणघाट 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!