देवळी -/ येथे सुजन इंग्लिश मिडीयम स्कूल येथे आंतरराष्ट्रीय विज्ञान दिवसानिमित्त विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते, विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला चालना मिळावी व विज्ञान या विषयाची अभिरुची निर्माण व्हावी या उद्देशाने हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते, या प्रदर्शनामध्ये माध्यमिक वर्गाच्या विद्यार्थ्यांनी उस्फूर्तपणे सहभाग घेतला होता, या प्रदर्शनाचे उदघाटन संस्थेच्या अध्यक्षा मा. डॉ. श्रद्धा चोरे यांच्या हस्ते करण्यात आले. संस्थेच्या अध्यक्षा मा. डॉ. श्रद्धा चोरे, संस्थेचे सचिव डॉ. प्रशांत चव्हाण, मुख्याध्यापिका प्रिया वैद्य, हायस्कूल विभाग प्रमुख कीर्ती कामडी, विज्ञान शिक्षिका कल्याणी वंजारी, यांनी मॉडेलचे परीक्षण करून सर्वोकृष्ठ मॉडल ला पुरस्कार देण्यात आला. यावेळी उपमुख्याध्यापिका पल्लवी काळे, सरला कापसे, निधी जानवे, सुनीता वाडकर,मोटघरे सर ,भोयर सर, गावंडे सर, सूरज डाखरे, स्नेहा लाडेकर, जगताप मॅडम, काठोके सर, शेंडे सर, वरघने सर, पाठक मॅडम, ओझा मॅडम, बुरांडे मॅडम, कात्रे मॅडम व सृजन इंग्लिश मिडीयम स्कूलच्या सर्व शिक्षक, शिक्षकत्तेर कर्मचारी व विध्यार्थी यांची उपस्थिती होती. सर्वोकृष्ठ मॉडल ला अध्यक्षा व सचिव यांच्या हस्ते पुरस्कार देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.