🔥वर्धा जिल्हयात प्रथमच होणार “देवा भाऊ राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा ”(मुले व मुली ज्युनीयर)…..
🔥देशातील २७ राज्यांतिल खेळाडूंचा असणार समावेश.
🔥राज्याचे मुख्यमंत्री च्या हस्ते होणार बक्षीस वितरण.
🔥बॉलीवूड कलाकारांची देखील असणार उपस्थिती.
वर्धा -/अॅम्युचर कबड्डी फेडरेशन ऑफ इंडिया यांच्यध मान्यतेने कबड्डी असोसिएशन विदर्भ संघ,नागपूर व सार्वजनिक बजरंग व्यायाम शाळा देवळी यांच्या संयुक्त विद्यमाने ५१ वी देवाभाऊ राष्ट्रीय कबड्डी (मुले व मुली ज्युनीयर) स्पर्धेचे आयोजन दि.९ ते १२ मे २०२५ पर्यंत विदर्भ केसरी खासदार रामदासजी तडस इनडोअर स्टेडीयम देवळी येथे करण्यात आले असून अंतीम सामना व बक्षिस समारंभ वर्धा दि. १२ मे २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता भगतसिंग मैदान (सर्कस ग्राऊन्ड),वर्धा येथे होणार आहे.या कार्यक्रमाकरीता मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहे.कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून दत्तात्रयजी भरणे मंत्री, क्रिडा व युवक कल्याण,महाराष्ट्र राज्य,कार्यक्रमाचे अध्यक्ष संजय राठोड मंत्री,मृद व जलसंधारण,महाराष्ट्र राज्य,प्रमुख उपस्थिती पंकज भोयर गृह (ग्रामिण), गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार व खनिकर्म राज्यमंत्री, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री,वर्धा जिल्हा,रावसाहेब दानवे माजी केंद्रीय राज्य मंत्री भारत सरकार, अॅड.श्री.ए. उशीजी रेड्डी प्रेसिडेंट, वर्ल्ड कबड्डी फेडरेशन जनरल सेक्रेटरी, ए.के.एफ.आय.कृष्णराजजी महाडिक युवा उद्योजक,कोल्हापुर, प्रमुख अतिथी दादारावजी केचे आमदार,विधान परीषद,राजेशजी बकाने आमदार, देवळी विधानसभा,समीरजी कुणावार आमदार,हिंगणघाट विधानसभा, सुमित वानखेडे आमदार,आर्वी विधानसभा च्या उपस्थितीत संपन्न होत आहे.
५१ वी देवाभाऊ राष्ट्रीय कबड्डी (मुले व मुली ज्युनीयर) स्पर्धेकरिता संपूर्ण भारतातून राज्यातील खेळाडू 1) गोवा २) गुजरात ३) राजस्थान ४) दिल्ली ५) हिमाचल प्रदेश ६) पंजाब ७) हरियाणा ८) उत्तराखंड ९) उत्तर प्रदेश १०) चंदीगड ११) मध्यप्रदेश १२) तेलंगाणा १३) छत्तीसगढ १४) उडीसा १५) आंध्रा १६) कर्नाटक १७) तामिलनाडू १८) पांडेचरी १९) केरला, २०) आसाम २१) मनिपूर २२) नागालँड, २३ सिक्कीम २४) जम्मू काश्मिर २५) विदर्भ २६) महाराष्ट्र २७) मिजोरम २८) लद्दाख इत्यादी राज्य सहभागी होत असुन सुमारे १२०० मुले व मुली सहभागी होत आहे. या स्पर्धेचे आयोजन देवळी येथील विदर्भ केसरी खासदार रामदास तडस इंडोअस स्टेडियम देवळी, जि. वर्धा येथे तसेच बक्षिस वितरण व समारोप दि. १२ मे २०२५ ला शहिद भगतसिंग मैदान (सर्कस ग्राऊंड) वर्धा. येथे आयोजित आहे.
बक्षीस वितरण व समारोपीय कार्यक्रम ’दि. १२ मे २०२५ स्थळ – भगतसिंग मैदान, रामनगर, वर्धा येथे होणार असुन देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या शुभहस्ते व पंकज भोयर,राज्यमंत्री,गृह (ग्रामीण), गृहनिर्माण,शालेय शिक्षण,सहकार व खनिकर्म तथा पालकमंत्री वर्धा जिल्हा यांच्या अध्यक्षेतखाली,तसेच प्रमुख उपस्थिती प्रताप सरनाईक, राज्य परिवहन मंत्री,अशोक उईके, आदिवासी विकास मंत्री महाराष्ट्र राज्य,प्रफुल्ल पटेल माजी केंद्रीय उड्डाण मंत्री,अॅड. श्री. ए.उशी रेड्डी प्रेसिडेंट, वर्ल्ड कबड्डी फेडरेशन, ए.के.एफ.आय. जनरल सेक्रेटरी, दादाराव केचे, आमदार विधानपरिषद (म.रा.),समीर कुणावार, आमदार हिंगणघाट विधानसभा क्षेत्र,राजेश बकाणे, आमदार देवळी विधानसभा क्षेत्र,सुमित वानखेडे, आमदार आर्वी विधानसभा क्षेत्र,वान्मथी सी जिल्हाधिकारी, वर्धा,जितीन रहेमान, मुख्यकार्यकारी अधिकारी, वर्धा, अनुरागजी जैन पोलिस अधिक्षक, वर्धा उपस्थितीत संपन्न होणार,
५१ वी देवाभाऊ राष्ट्रीय कबड्डी (मुले व मुली ज्युनीयर) स्पर्धा प्रथमच वर्धा जिल्हयात होणार असुन या स्पर्धेचे आपण प्रिंट मिडीया, इलेक्ट्रॉनिक्स मिडीयाच्या माध्यमातुन प्रसिध्दी द्यावी असे यावेळी व मा.ना.डॉ. पंकजजी भोयर ,राज्यमंत्री, गृह (ग्रामीण), गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार व खनिकर्म तथा पालकमंत्री वर्धा जिल्हा यांनी आवाहन केले, पत्रकार परिषेदला स्वागत समिती अध्यक्ष माजी आमदार सागर मेघे, माजी खासदार तथा अध्यक्ष कबड्डी असो. विदर्भ संघ, नागपूर रामदास तडस, सचिव प्रदिपसिंह ठाकुर,भाजप शहराध्यक्ष निलेश किटे,सुनील जी बुरांडे,सतीश इखार,अमित सिंग ठाकूर यांच्या सह इतर मान्यवर उपस्थित होते.