🔥समृद्धी आय.टी.आय देवळी येथे शिवराज्याभिषेक दिन साजरा.
देवळी -/ येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून मंगलप्रभात लोढा मंत्री कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता विभाग महाराष्ट्र यांच्या संकल्पनेतून आज समृद्धी आय.टी.आय देवळी येथे 352 वा शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये भारताचा
जाज्वल्य इतिहास आणि देशासाठी समर्पणाची भावना रुजावी, पर्यावरण संवर्धनाची भावना जागृत व्हावी या हेतूने व्याख्यानमालेचे आयोजन संस्थेत करण्यात आले.
या मंगलमयी सोहळ्याला अध्यक्ष म्हणून जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेचे प्राचार्य धर्मेश जी झाडे तर व्याख्यानमालेचे प्रमुख वक्ते म्हणून देवळी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक अश्विन गजभिये उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून समृद्धी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे संचालक तसेच पोलीस पाटील (ईसापुर) प्रफुल कारमोरे यांची उपस्थिती होती.
तसेच गजभिये यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात नागरिक कर्तव्य आणि शिष्टाचार याबाबत प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन केले.
देशाप्रती आणि समाजाप्रती आपली काय कर्तव्य आहे आणि जीवनात शिष्टाचार किती महत्त्वाचा आहे याबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना इत्यंभूत मार्गदर्शन केले.अध्यक्षही भाषणात झाडे सर यांनी याच दिवशी हा सोहळा घेण्यामागचे कारण काय याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले छत्रपती शिवाजी महाराजांचे कौशल्य दूरदृष्टी रयतेला उदयन मुख करण्याची त्यांची कला त्यांची नाविन्यता काय होती याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी प्रांजली मुनेश्वर यांनी केले तर प्रास्ताविक संस्थेचे प्राचार्य मोरेश्वर पडोळे यांनी सादर केले.आभार प्रदर्शन गौरव आदमने यांनी केले.सोहळा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी निखिल नेहारे तेजस सातपुते अनिकेत शिदोडकर व विद्यार्थी यांनी अथक परिश्रम घेतले.