🔥“शाश्वत शेती दिन” – म. स. स्वामिनाथन यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दहेगाव (मिस्किन) येथे उत्सव.
वर्धा -/दहेगाव (मिस्किन) येथील जिल्हा परिषद शाळेत भारताच्या हरित क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जाणारे पद्मविभूषण डॉ. म. स. स्वामिनाथन यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ “शाश्वत शेती दिन” (Sustainable Agriculture Day) उत्साहात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शाळेचे मुख्याध्यापक अनंत बोबडे सर होते.कार्यक्रमाचे आयोजन बजाज कॉलेज ऑफ अॅग्रिकल्चर, पिपरी (वर्धा) येथील विद्यार्थ्यांनी केले. आयोजक विद्यार्थी – कृष्णा घुरका, शांतनु कोहळे, मिहीर काळबांडे, हर्ष राठी, लक्ष्मीनारायण वैद्य, प्रणव कुम्भळकर, देवाशिष गड्डे.कार्यक्रमाचे मार्गदर्शन बजाज कॉलेज ऑफ अॅग्रिकल्चरच्या प्राचार्या डॉ. स्नेहल देशमुख मॅडम, तसेच रवींद्र खरचे सर, डॉ. मंगेश घोडे सर, डॉ. राणी मोरे मॅडम, डॉ. श्रुतिका भोयर मॅडम आणि डॉ. कविता चोपडे मॅडम यांनी केले.या प्रसंगी शाश्वत शेतीचे महत्व, माती संवर्धन, पाणी बचत, नैसर्गिक शेती पद्धती आणि भविष्यातील अन्नसुरक्षा यावर मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी विविध सादरीकरणांद्वारे डॉ. म. स. स्वामिनाथन यांच्या कार्याची माहिती दिली आणि त्यांच्या योगदानाची उजळणी केली.कार्यक्रमाला गावातील शेतकरी, विद्यार्थी आणि ग्रामस्थ यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शेवटी आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.