🔥श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त हिंगण्यात भव्य दहीहंडी उत्सव – तरुणाईच्या उत्साहाने रंगला जल्लोष.
हिंगणा -/ नगर पंचायत क्षेत्रातील वार्ड क्रमांक १५, नाना-नानी पार्क, धनगरपुरा येथे युवा संघर्ष क्रीडा मंडळ तर्फे दि. १७ ऑगस्ट रोजी रविवारच्या दिवशी श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त गोपालकाला दहीहंडी उत्सव मोठ्या थाटामाटात आणि उत्साहवर्धक वातावरणात साजरा करण्यात आला. या सोहळ्यामुळे परिसरात उत्सवाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हिंगणा नगर पंचायत नगराध्यक्षा सौ. लताताई गौतम होत्या. उद्घाटन माजी नगरसेवक फुलचंद शेलकर यांच्या हस्ते पार पडले. तर प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक विष्णूभाऊ कोल्हे, माजी पंचायत समिती सदस्य सुनील बोंदाडे, तारुश बांदरे, राजेश ठाकरे, अमोल, तेलंग साहेब, पाटील साहेब, संजय शिंगणे, युवा संघर्ष अध्यक्ष जयंत निवांत आणि मंगेश बोबडे, परेश बुधे , हिमांशु निवांत , माधव नन्नावरे , जितेंद्र ठाकरे , अमित माहूरे. आशिष सेलकर यांची उपस्थिती लाभली.
या दहीहंडी सोहळ्यात युवा संघर्ष मंडळातील तुषार धडेल, अक्षय माहूरे, दादू वांगळे, मिथुन, जितू ठाकरे, दिवांशु पवार, पूरब चाकुंदे यांसारख्या तरुण सदस्यांनी मोठ्या जोशात सहभाग घेतला. तरुणाईच्या जयजयकाराने वातावरण भारावून गेले होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन प्रतीक शेलकर यांनी केले. विजयी पथकाला बक्षिसे तारुष बांदरे व जयंत निवांत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. तसेच विजेत्यांचा सत्कार करून त्यांचा उत्साहवर्धन करण्यात आला.
दहीहंडी सोहळ्यानंतर विविध सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये नृत्य, गीत-संगीत तसेच बालकृष्णांची झांकी सादर करून उपस्थितांना आनंदोत्सवात सहभागी करून घेण्यात आले. उपस्थित नागरिकांनी संपूर्ण कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या भव्य कार्यक्रमामुळे हिंगण्यातील श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सवाला एक वेगळेच रंग प्राप्त झाले असून, तरुणाईच्या उत्साहाने परिसरात ऐक्य, उत्सवभावना आणि आनंदोत्सवाचे वातावरण फुलले होते.