५५ वर्षांची अखंड सेवा, तरीही शासन कलाकार योजनेपासून वंचित – हिंगणातील ह.भ.प. बालकदास महाराजांचे दुर्लक्षित जीवनकार्य..

0

🔥५५ वर्षांची अखंड सेवा, तरीही शासन कलाकार योजनेपासून वंचित – हिंगणातील ह.भ.प. बालकदास महाराजांचे दुर्लक्षित जीवनकार्य.

🔥रामकथा,शिवभक्ती आणि संतवाणीचा प्रदीर्घ प्रवास… पण शासकीय न्याय अजूनही प्रतीक्षेत.

 हिंगणा -/ ह.भ.प. बालकदास गोपालदास राऊत महाराज (जन्म : दि. २७ जुलै १९४९, शिवाजीनगर, महाल, नागपूर) हे गेली १९७६ पासून म्हणजेच जवळपास ५५ वर्षांहून अधिक काळ रामकथा, संगीत तुलसीदास रामायण, कीर्तन, भजन, कथा, अभिषेक व विविध धार्मिक कार्यक्रमांच्या माध्यमातून समाजप्रबोधन करीत आहेत.

🔥हिंगणा–डेगमात तीन दशकांची निस्वार्थ सेवा.

मागील २५ वर्षांपासून हिंगणा तालुक्यात वास्तव्यास असलेले बालकदास महाराज, डेगमा गावात गेली ३० वर्षे अखंडपणे धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम घेत आहेत. आज वय ७७ वर्षे पूर्ण होऊनही ते नियमित प्रवचन, कथा व धार्मिक कार्यक्रम करीत आहेत, ही बाब अत्यंत प्रेरणादायी आहे.

🔥महत्त्वाचा मुद्दा : शासन कलाकार योजनेपासून आजही वंचित.

इतकी दीर्घ, सातत्यपूर्ण आणि नोंदवहीत उपलब्ध असलेली सेवा असूनही, ह.भ.प. बालकदास महाराज आजही शासनाच्या कलाकार कल्याण योजना / शासन कलाकार योजनेपासून वंचित आहेत, ही बाब अत्यंत चिंताजनक आणि दुर्दैवी आहे.
५५ वर्षांची अखंड सेवा, शेकडो कार्यक्रमांची पत्रके व पुरावे उपलब्ध,
ग्रामीण भागात संस्कार व अध्यात्माचे कार्य , वयोवृद्ध अवस्थेतही सक्रिय योगदान ,
असे असतानाही शासन स्तरावर अद्याप कोणतीही ठोस मदत, मानधन किंवा कलाकार म्हणून मान्यता मिळालेली नाही, हा प्रश्न केवळ एका व्यक्तीचा नसून, अनेक लोककलावंत व वारकरी कलाकारांच्या दुर्लक्षाचे प्रतीक आहे.
पंचावन्न वर्षांची सेवा असूनही शासकीय योजना लाभ नाही, संतपरंपरा जपणाऱ्या कलाकारांबाबत उदासीन प्रशासन,
ग्रामीण भागातील लोककलावंतांचा शासनाकडून दुर्लक्ष, समाजासाठी झटणाऱ्या कलाकारांना आयुष्याच्या संध्याकाळीही संघर्ष,

🔥ह.भ.प. बालकदास महाराज – चालते-बोलते तीर्थ.

आज हिंगणा, डेगमा व परिसरात ते “ह.भ.प. बालकदास महाराज” या नावाने श्रद्धेने ओळखले जातात. त्यांची रामकथा ही केवळ धार्मिक नव्हे, तर माणुसकी, सदाचार आणि समाजघडणीची शिकवण देणारी आहे.

🔥निष्कर्ष : शासनाने दखल घेण्याची गरज.

संतवाणीचा वारसा जपणारे, आयुष्य समाजासाठी अर्पण करणारे ह.भ.प. बालकदास महाराज यांना शासन कलाकार योजनेचा लाभ तात्काळ देणे ही केवळ मदत नसून, न्याय आणि सन्मान ठरेल.

🔥आता प्रश्न एवढाच – ५५ वर्षांची सेवा पुरेशी नाही का ?

गजानन ढाकुलकर साहसिक News-/24 हिंगणा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!