🔥आष्टी शहरात घाणीचे साम्राज्य नागरिकांचे आरोग्य धोक्यात.🔥हेच ते सहा महिन्यापासून एक दिवसा आड गढूळ पाणी पुरवठा,घाण पाणी वाहून जाणाऱ्या नाल्या तुंबल्या, घन कचरा व्यवस्थापन प्रक्रिया झाली रामभरोसे….
आष्टी शहीद -/ आष्टी नगर पंचायत च्या हद्दीतील सर्व प्रभागात गेल्या सहा महिन्यापासून एक दिवसा आड पिण्याच्या पाण्याचा गढूळ पाणी पुरवठा होत असून सांडपाणी वाहून जाणाऱ्या नाल्या उपसल्या नसल्याने शहरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. तर घन कचरा वाहून नेणाऱ्या घंटा गाड्या बंद झाल्याने आष्टी शहरातील प्रत्येक वार्डात दुर्गंधी पसरली असून डास, मछर चे प्रमाण वाढतीवर असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
सविस्तर असे की,
आष्टी शहरातील घाण पाणी वाहून नेणाऱ्या नाल्या उपसल्या नसल्याने नाल्या बुजून चोक अप झाल्या, नाल्या चोक अप झाल्यावर त्या उपसन्यकारिता नगर पंचायत विभागाने कोणतीही उपाय योजना केली नाहीं. तर दुसरीकडे घन कचरा व्यवस्थापन करणारी यंत्रणा चा कार्यभार मनमानी सुरु आहे. गेल्या सहा महिन्यापासून घन कचरा व्यवस्तपण करणाऱ्या यंत्रनेने पैसे उपलब्ध नाहीं हे कारण समोर करून घंटा गाड्या बंद केल्या. तर काही प्रभागात कचरा उचलण्याकरिता गाड्या फिरवल्या जातात मात्र त्या वाहणात कचरा टाकण्यात मनाई करण्यात येते. शहरातील मेन मार्केट, आठवडी बाजार, बस स्टॅन्ड परिसरात जागोजागी कचऱ्याचे ढीग नजरेस पडते. दुसरीकडे आष्टी शहरात गेल्या सहा महिन्यापासून नागरिकांना स्वछ पिण्याचे पाणी मिळत नाहीं. याउलट एक दिवसा आड नळ येत असून त्यात गढूळ पाणी येत असल्यामुळे पिण्यास योग्य नाहीं. असे असले तरी आष्टी नगर पंचायत मुख्य अधिकारी वं नगर अध्यक्ष गप्प आहे. पाणी पुरवठा विभागातील अभियंता नरपाचे हा नगर पंचायत कार्यालयात राहत नसून गैर हजर असतो. समस्या असल्यास फोन केल्यावर फोनला प्रतिसाद देत नाहीं. नगर पंचायत चे मुख्य अधिकारी वं नगर अध्यक्ष यांना नागरिकांच्या समस्याचे निराकरण करता येत नसल्याने शहरातील नागरिकांत नगर पंचायत प्रशासनाप्रति नाराजीचा सूर आहे. शहरातील सर्व समस्या आ वासून उभ्या असल्यामुळे आष्टी वासियांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
आष्टी नगर पंचायत ला 15व्या वित्त आयोगातून 29लाख रुपये प्राप्त झाले आहे. कामाचे नियोजन नसल्याने घन कचरा व्यवस्थापन प्रक्रिया रखडली आहे. मुख्य टाकी बंद केल्यामुळे आष्टी शहरात पिण्याच्या पाण्याची समस्या आता पाचवीला पूजली आहे. नगर पंचायत अधिकारी वं पदाधिकारी यांच्या मनमाणीमुळे एक दिवसा आड पाणी पिण्याची वेळ आली आहे. (मनीष ठोंबरे-नगरसेवक आष्टी नगरपंचाय)