अत्यंत धक्कादायक : अवैधरित्या लावलेल्या शेतातील करंटच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू
प्रतिनिधी / देवळी :
23 डिसेम्बर 2021च्या रात्रीच्या वेळी मृतक प्रशांत दसरत डोंगरे वय( 53) वर्ष हे शेतात असलेले माकडे हाकलण्याकरिता करिता गेले असता ते दोन दिवसापासून बेपत्ता होते. गावातील नागरिकांनी आणि नातेवाईकांनी सर्वत्र शोधाशोध केली असता ते दोन दिवस मिळून आले नाही. परंतु 25 डिसेंम्बर 2021 ला सकाळी दहा वाजता त्यांचे प्रेत त्यांच्या शेतात पराठीच्या ओळीमध्ये मिळून आले त्यामुळे आणखी संशयवाढत गेला .सदर परिसरातील नातेवाईकांनी पाहणी केली असता मृतक प्रशांत दशरथ डोंगरे हे वन्यप्राणी हाकलत असताना अनोळखी इसमाचा शेतातील करट लागून मृत्यू झाला आणि त्यानंतर मृतकाचे प्रेत दोन दिवसांनी त्याच्या शेतात आणून टाकले व पुरावा नष्ट केला अशी तक्रार मृतकाचे नातेवाईक ज्ञानेश्वर पुंडलिक जवादे यांनी देवळी पोलीस स्टेशनला तक्रार दिली. यावरून मौका तपासणी केली असता 1)सुनील किशोर राऊत वय (50) वर्ष रा.देवळी यांच्या शेतात लोखंडी कुंपणाला करंट लावून असल्याचे निदर्शनास आले आणि त्यानंतर घटनास्थळी काही फेरबदल सुद्धा करण्यात आले पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला असे निदर्शनास आले . यावरून 1) सुनील किशोर राऊत वय( 55) वर्ष आणि या कामात त्यांना मदत करणारे 2) गजानन कडूजी मरापे (38) रा. पिंपळगाव लुटे 3) सुनील दिवाकर मानकर वय( 42) रा.दापोरी, 4) सतीश रामराव चौधरी वय (52)रा. पिंपळगाव लुटे यांना अटक करण्यात आली. आरोपीविरोधात कलम 304,201 भादवी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास देवळीचे ठाणेदार तिरुपती राणे यांच्या मार्गदर्शनात देवळी पोलिस करीत आहे.