🔥वार्षिक पुण्यतिथी महोत्सव,सद्गुरू परमहंस श्री कृष्णगीरी महाराज विश्वशांती धाम संस्थान, धोत्रा (रेल्वे)येथे.
वर्धा -/ दरवर्षि प्रमाणे या ही वर्षी सद्गुरू परमहंस श्री कृष्णगीरी महाराज पुण्यतिथी महोत्सव-2026 आणि स्व. शंकरबाबा गुल्हाने व स्व. विमलआई शंकरराव गुल्हाने यांच्या पावन स्मृती प्रित्यर्थ “शिव महापुराण कथे” चे आयोजन केले आहे. कथेचे प्रवक्ते पूज्य श्री श्यामनारायणदासजी महाराज (श्री अयोध्या, संस्थापक श्री मधुरम सेवा प्रतिष्ठान अमरावती) यांच्या पावन मुखातुन बुधवार दिनांक 14/01/2026 पासुन आरंभ झाली आहे.
शिव म्हणजे श्री गुरु स्वरूपत्र त्रैलोख्याचे गुरुतत्व मान्य असून त्याच गुरुतत्वाची सेवा आई बाबानी आयुष्यभर केले त्याचा परिणाम ते शिवस्वरूप संत स्वरूप कृष्णगीरी स्वरूप होऊन त्यांनी आपल्या जिवनाच्या उध्दाराचा मार्ग निश्चित केला. सर्वसाधारण मनुष्याच्या जिवनाचे कल्याणाचे आहे पण नेमके आणि ज्यांच्या करण्याने मनुष्याच्या जिवनाचा एक क्षणही वाया जाणार नाही याकरता जे मार्गदर्शन अनेक ग्रंथांमध्ये केलंय त्या ग्रंथामध्ये शिव महापुराण हे अग्रगण्या आहे.