Breaking news,,वीर जवानाच्या सन्मानार्थ आमदार सुमित वानखेडेंचा मोठा निर्णय; आर्वी नगरपरिषदेचा पदग्रहण सोहळा स्थगित….

0

🔥वीर जवान सुरेंद्र बाबाराव कुंभरे देशाच्या सेवेसाठी तब्बल सोळा वर्ष अहोरात्र संरक्षण करणाऱ्या या वीर पुत्राला दैनिक साहसिक न्यूज – 24 कडून अखेरचा सलाम व भावपूर्ण श्रद्धांजली  

आर्वी -/ तालुक्यातील चिंचोली (डांगे) येथील सुपुत्र आणि आयटीबीपीचे वीर जवान सुरेंद्र बाबाराव कुंभरे यांच्या निधनामुळे संपूर्ण आर्वी विधानसभेत शोककळा पसरली आहे.देशाच्या सीमेचे १६ वर्षे अहोरात्र संरक्षण करणाऱ्या या वीर पुत्राला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आर्वीचे आमदार सुमित वानखेडे यांनी एक अत्यंत संवेदनशील आणि राष्ट्रप्रेमी निर्णय घेतला आहे. आज होणारा पुर्व नियोजित आर्वी नगरपरिषदेचा नवनिर्वाचित नगराध्यक्षा व नगरसेवकांचा पदग्रहण आणि सत्कार समारंभ रद्द करून तो उद्यावर ढकलण्यात आला आहे. ‘सत्ता आणि खुर्चीपेक्षा राष्ट्र आणि राष्ट्ररक्षक मोठे आहेत’ हा संदेश या निर्णयाद्वारे आमदार वानखेडे यांनी दिला आहे.

भारतीय जनता पक्षाची ‘राष्ट्र प्रथम’ ही भूमिका केवळ घोषणांपुरती मर्यादित नसून ती कृतीतही आहे, हे आमदार सुमित वानखेडे यांनी आज दाखवून दिले. आपल्याच मातीतील एक जवान देशसेवा बजावत असताना शहीद (निधन) झाले असताना उत्सवी कार्यक्रम करणे उचित नाही, ही भावना ठेवून त्यांनी नियोजित कार्यक्रम स्थगित करण्याच्या सूचना दिल्या. भारत-तिबेट सीमा सुरक्षा दल मध्ये 0° डिग्री च्या खालच्या अतिशय कठीण तापमानात कार्यरत जवानाच्या बलिदानाप्रती असलेली ही आदरभावना आणि संवेदनशीलतेमुळे राजकीय वर्तुळात तसेच सर्वसामान्य जनतेमध्ये भाजप आणि आमदार वानखेडे यांच्याबद्दल आदराची भावना निर्माण झाली आहे.

१ जानेवारी १९४८ या दिवशी आदिवासी समाजांचा काला दिन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या याच   आदिवासी समाजातून कोल्हापूररी वीर पुत्र सुरेंद्र कुंभरे यांनी २००९ पासून भारत-तिबेट सीमा सुरक्षा दलात (ITBP) आपली सेवा प्रामाणिकपणे बजावली. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच आमदार सुमित वानखेडे यांनी तात्काळ कुटुंबाचे सांत्वन केले आणि प्रशासनाला शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना दिल्या. आज चिंचोली येथे वीर जवानाच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहे. जवानाच्या सन्मानासाठी सत्तेचा सोहळा लांबणीवर टाकण्याच्या या निर्णयाचे शहरात कौतुक होत असून, यातून भाजपची ‘राष्ट्राप्रती असलेली सद्भावना’ खऱ्या अर्थाने अधोरेखित झाली आहे.

नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार
वीर जवानाला मानवंदना देण्यासाठी आजचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. आता उद्या, नगराध्यक्षा आपला पदभार स्वीकारतील आणि सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार समारंभ पार पडेल. राजकीय गणितांपेक्षा सामाजिक बांधिलकी आणि देशप्रेमाला प्राधान्य देणाऱ्या आमदार सुमित वानखेडे यांचा या निर्णयाचे स्वागत होतांना दिसत आहे.

ब्युरो रिपोर्ट साहसिक News -/24 आर्वी -वर्धा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!