🔥बुलढाणा तालुक्यातील रायपूर येथील एका 42 वर्षीय इसमाने केली गळफास लावून आत्महत्या.
बुलढाणा-/आज दिनांक 03/02/2026 चे 10.30 वाजता सुमारास विजय किसन मुरडकर वय 42 वर्ष रा रायपुर हे त्यांच्या पत्नीला त्यांच्या रायपुर शिवार गट नं 461 मधील शेतात जातो असे सांगून घरून निघून गेले त्या नंतर त्यांच्या पत्नीने त्यांचा जेवणाचा डब्बा घेऊन त्यांचा दिर परमेश्वर किसन मुरडकर यांना शेतात पाठवले असता त्यांनी त्यांचा भाऊ विजय किसन मुरडकर याला फोन केला असता फोन चा आवाज शेतातील टीनाचे बखारीत येत असल्याने त्यांनी तेथे जाऊन पहिले असता त्यांना त्यांचा भाऊ लोखंडी अँगल ला मरून लटकलेला दिसला अशा रिपोर्ट वरून पोलीस स्टेशन रायपूर येथे आकस्मात मृत्यू ची नोंद करण्यात आली असून सदर घटनेचा तपास ठाणेदार निलेश सोळंके यांचे मार्गदशनाखाली पोहेका काकडे हे करीत आहे.