🔥NHM कर्मचाऱ्यांचा 19 ऑगस्ट पासून बेमुदत संप सुरू,वर्धा जिल्ह्यातील 640 कर्मचारी सहभागी.
वर्धा -/ शासन प्रशासनाने योग्य तोडगा न काढल्यामुळे अखेर राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी कर्मचारी संघटना एकत्रित करून समितीच्या वतीने आज वर्धा येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथून मोर्चा काढून जिल्हा परिषद कार्यालयावर तीव्र निदर्शने करून आज 19 ऑगस्ट पासून बेमुदत संप पहिला दिवस सुरू करण्यात आलेला आहे
आंदोलननाचे नेतृत्व राज्याध्यक्ष कंत्राटी नर्सेस युनियन आयटक राज्य सचिव कॉम्रेड दिलीप उटाणे . संगीता रेवडे प्रवीण बाचलकर शमा खान अन्नपुर्णा ढोबळे प्रकाश पुनवटकर सुमंत ढोबळे, मनोज वरभे डॉ माधूरी निमसटकर रेखा मानकर यांच्या नेतृत्वात करण्यात आले.
संप काळात आरोग्य सेवेवर विपरीत परिणाम झाल्यास जबाबदार शासन प्रशासन राहील
शासन निर्णय 14 मार्च 2024 नुसार राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी यांचे तात्काळ समायोजन करा उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या निर्णयानुसार महाराष्ट्र शासनाने राष्ट्रीय आरोग्य अभियान(NHM) अंतर्गत कंत्राटी अधिकारी व कर्मचारी ज्यांची सेवा दहा वर्ष व त्यापेक्षा अधिक झालेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या समक्ष पदावर मंजूर पदाच्या 30% पदावर सामावून घेण्याचा निर्णय घेतला शासन निर्णय निर्गमित केला परंतु मागील 16 महिन्यापासून ज्या कर्मचाऱ्यांनी आपल्या जीवाची व कुटुंबाची परवा न करता कोरोना काळात सेवा दिली त्या कर्मचाऱ्यांना अजून पर्यंत शासन सेवेत समायोजन केलेले नाही त्यामुळे राज्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी व कर्मचारी यांच्यात प्रचंड असंतोष निर्माण झालेला आहे.शासन व प्रशासनाला आयटक संलग्न महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते कंत्राटी नर्सेस युनियन तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियान संघटना एकीकरण समिती च्या वतीने अनेक निवेदन दिले एवढेच नव्हे तर 10 व 11 जुलै रोजी आझाद मैदान येथे 5000 कर्मचाऱ्यांनी लक्षवेध आंदोलन केले त्यावेळी सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी लवकरच समायोजनाची प्रक्रिया करण्यात येईल अशी आश्वासन दिले होते परंतु एक महिना होऊन सुद्धा कुठलीही कार्यवाही एकही समायोजनाचे आदेश अजून पर्यंत काढलेले नाहीत याकडे माननीय मुख्यमंत्री यांनी लक्ष देण्याची गरज आहे असे मत आयटक संघटनेचे राज्यसचिव दिलीप उटाणे यांनी व्यक्त केले 21 जुलैपासून राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी व कर्मचारी बेमुदत संपावर जाणार होते परंतु प्रशासनाने लिखित पत्र देऊन विनंती केली त्यामुळे शासनाच्या विनंतीला मान देऊन संप तूर्त स्थगित करण्यात आला होता.परंतु प्रशासन आश्वासन देऊन दुर्लक्ष करीत असल्यामुळे राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी यांच्या 20 संघटनांनी एकत्रिकरण समिती निर्माण करून येणाऱ्या 19 ऑगस्ट 2025 पासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला असून आजपासून संप सुरू केलेला आहे. शासनाने व प्रशासनाने याबाबत संघटना प्रतिनिधीची बैठक घेऊन योग्य तो निर्णय करावा अशी मागणी एकत्रिकरण समितीने केलेली आहे शासन या काळात आरोग्य सेवेवर विपरीत परिणाम झाल्यास त्याला शासन व प्रशासन जबाबदार राहील असे मत माध्यमांशी बोलताना आयटक राज्य सचिव कॉ दिलीप उटाणे यांनी सांगितले.आजही राज्यात आरोग्य सेवेत मोठे रिक्त पदे असून अनेक वर्षापासून फक्त कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यावर आरोग्य सेवेची धुरा आहे हे प्रशासनाला माहीत असून सुद्धा उच्च न्यायालय औरंगाबाद न्यायालयाने निर्णय देऊन सुद्धा योग्य निर्णय घेतलेला नाही.कंत्राटी म्हणून अनेक अधिकारी कर्मचारी यांनी 19 वर्ष सेवा दिल्याने ते आता सेवानिवृत्तीच्या उमरठ्यावर उभे आहेत त्यांना न्याय मिळेल की नाही या चिंतेने कर्मचारी ग्रस्त झालेले आहेत.त्यामुळे शासन प्रशासनाने योग्य निर्णय घ्यावा या संपात राज्यातील 34000 अधिकारी व कर्मचारी सहभागी आहेत तर वर्धा जिल्ह्यातील ६४० कर्मचारी सहभागी आहेत त्यामुळे आरोग्य सेवा विस्कळीत होण्याचे चिन्ह दिसत आहे.संगीता रेवडे प्रवीण बाचलकर अन्नपूर्णा ढोबळे क्षमा खान सुमंत ढोबळे अजय विश्वकर्मा अजय विश्वकर्मा सचिन आडे डॉक्टर माधुरी निमसटकर डॉक्टर जोशना भांगे ललिता वाघ भावना कदम सुशीला शिंदे संदीप नारीकर यांनी आपले विचार व्यक्त केले शासन प्रशासनाने योग्य निर्णय घेतल्यास संप सुरूच ठेवण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.