शेगाव -/संत नगरी शेगाव येथे डॉ.सौ. स्वातीताई वाकेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सातपुडा परिवाराच्या पुढाकाराने समस्त शेगावकरांच्या उपस्थिती आज बदलापूर, काझीखेड तथा कलकत्ता येथे महिलांवर झालेल्या अत्याचारविरुद्ध कॅण्डल मार्च काढण्यात आला .
हा कॅन्डल मार्च अग्रसेन चौकातून सुरुवात होऊन शिवाजी चौक– गांधी चौक – आंबेडकर चौक – लहुजी चौकातून -शिवनेरी चौकात या कँडल मार्च चा समारोप झाला या कॅन्डल मार्चमध्ये सातपुडा परिवाराच्या विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिकाद्वारे महिलावर होणाऱ्या अत्याचार यावरील नाटिका करून दाखवले. हे प्रात्यक्षिक अंगावर रोमांच उभे करणारे व मनाला चटका लवणारे होते. त्यानंतर कॅन्डल मार्चला सुरुवात झाली. कॅन्डल मार्चमध्ये शेगाव शहरातील शेकडो महिला भगिनी विद्यार्थिनी तसेच पुरुषांनी आपला सहभाग नोंदविला.
महिलांना संरक्षण मिळालच पाहिजे, महिलांना न्याय मिळालाच पाहिजे अशा गगनभेदी घोषणांमध्ये हा कॅन्डल मार्च पुढे मार्गस्थ होत शिवनेरी चौकामध्ये याचा समारोप झाला. यावेळी युवतींनी आपल्या भाषणातून होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडली व महिलांना संरक्षण सोबत न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी केली यावेळी सातपुडा संस्थेच्या डॉ.सौ.स्वातीताई वाकेकर यांनी आपल्या भावना व्यक्त करतांना महाराष्ट्रात वाढलेल्या महिलांवरील अन्यायाच्या विरोधात सर्वांनी एकत्र येऊन आवाज उठविला पाहिजे व आपल्या न्याय हक्कासाठी या असंवेदनशील सरकारला जागे करण्याची गरज आहे.
महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना खऱ्या अर्थाने संरक्षणाची गरज आहे.
नराधमांना कठोर शिक्षा व्हावी, त्यांना भर चौकात फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे. जेणेकरून भविष्यात पुढे कोणी अस धाडस करणार नाही असे वक्तव्य केले.
यावेळी मंगला पाटील, कविता देशमुख, माया दामोधर यांची समायोचित भाषणे झाली
यावेळी शेगाव शहरातील माजी नगराध्यक्ष शिवाजी बुरुंगले ,माधुरी देशमुख,मंगला पाटील, अविनाश दळवी,बुढण जमदार,किरण देशमुख,विजय काटोले,विनोद साळुंखे,गोपाल कलोरे,जयंत खेडकर,कैलास कासेलानी, दीपक सलामपुरिया, मिराताई माळी, कविता धनोकार, कविता देशमुख, बसंत शर्मा, गणमान्य व्यक्तीं सोबत महिला व सातपुडा फार्मसी महाविद्यालयांचे विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी आदींनी आपला सहभाग नोंदविला…