वर्धा -/ महात्मा गांधी यांनी वं.राष्टूसंत श्री तुकडोजी महाराजाना सेवाग्राम आश्रमात येउन राहण्याचा निरोप दिला राष्ट्रसंतानी होकार देऊन नियोजित तारखेवर आश्रम गाठले महिनाभर दैनंदिन सूतकताई, ग्रामसफाई ,सामुदायिक प्रार्थना प्रबोधना सोबत दोन्ही महापुरुषाच्या भजनाच्या मैफिली रंगल्या दीर्घ भेटीचा कालावधी १४ ऑगस्ट १९३६ ला संपला आणी वं.राष्टूसंत परत निघाले खुद्द बापु त्याना दुर सोडायला आले टागां दुरवर निघुन जाताच बापु आश्रमात परतले म्हणाले, गजब का बुवा है, आज बुधवार या ऐतिहासिक घटनेला ८८ वर्ष पुर्ण होउन ८९ व्या वर्षांत ही दोन्ही राष्ट्रपिता व राष्ट्रसंत ची अविस्मरणीय भेट पदार्पण करीत आहेत, वं.राष्टूसंत श्री तुकडोजी महाराज याच्या मार्गदर्शनात अमरावती जिल्ह्य़ातील सालबर्डी येथे वं.राष्टूसंता नी अभूतपूर्व असा यज्ञ घडवुन आणला काहीनी तुकड्यादास महाराज बुवाबाजी करुन लोकाना फसवीत असल्याची माहीती बापुना दिली नागपुरात या दोन नेत्याची भेट होउन दोन तास चर्चा झाली बापुच्या मनातील वं.राष्टूसंता विषयीचे ग्रह दुर झाले काही दिवसानंतर बापुनी वं.राष्टूसंता ना आपन सेवाग्राम आश्रम मध्ये वास्तव्यास यावे असा पञ व्यवहार केला वं.राष्टूसंता नी १३ जुलै ते १४ ऑगस्ट ही तारीख कळविली व माझ्या सोबत एक सेवक असल्याचे कळविले ठरल्या प्रमाने नारायणराव बोडखे याना सोबत घेऊन सेवाग्राम आश्रम येथे आदी निवास मध्ये राहण्याची व्यवस्था केली सेवाग्राम आश्रम व्यवस्थापक बलवतं सिंह या सेवकाने वं.राष्टूसंता ना आश्रमाची नियमावली समजावून सागीतंली बापुसोबत,कस्तुरबा गांधी,राजकुमारी अमुर्ता कौर,खान अब्दुल गफार खान आदी मोठी मंडळी वास्तव्यास होती या महीन्या भरात सेवाग्राम आश्रमात च्या दिनचर्या नियम वं.राष्टूसंत काटेकोर पाळत होते,तर दुसरीकडे बापु वं.राष्टूसंतावर बारीक नजर ठेवून होते ता दरम्यान महाराजाचे वय २७ तर बापुचे वय ६८ वर्षांचे होते याच दरम्यान पुज्य बापुचे वं.राष्टूसंता च्या भजनाने मौन सुठले होते लोकानी चुकीचा संदेश व पञ व्यवहार केल्या मुळे बापुनी महाराजाना आश्रमात बोलाविले या एक महिन्याच्या वास्तव्यास पुज्य बापुना देशाला दिशा देणारा महात्मा पहायला मिळाला आध्य ग्रामगीताचार्य रामकृष्ण दादा बेलुरकर यानी या सेवाग्राम एक महिन्याच्या वास्तव्यावर सखोल विश्लेषण करून राष्ट्रसंत व राष्ट्रपिता मांडलेले आहेत, संपूर्ण महिनाभर पुज्य बापुना एक चुकीची गोष्ट वं.राष्टूसंता संदर्भात आढळून आली नाही एक महीन्या नतंर महाराजाचा जाण्याची वेळ आली स्वता बापुनी त्याना टांग्यात बसविले ,आनी म्हनतात गजब का बुवा है, या घटनेला १४ ऑगस्ट ला ८८ वर्ष पुर्ण होत आहेत.