🔥अपघात ग्रस्त लोकांना मदत करून जपली माणुसकी,प्रमोद बिजवे बनला अपघात ग्रस्तांसाठी देवदूत.🔥शिवसेना ( उबाठा) शाखा साहुरच्या वतीने होणार सत्कार.
आष्टी -/ तालुक्यातील माणिकवाडा ते कारंजा रस्त्यावर मोठा अपघात झाला होता त्यामध्ये काही तरूणांना जबर मार लागला होता ते रस्त्याच्या कडेला पडलेल्या अवस्थेत साहुर येथील रहिवासी प्रमोद बिजवे यांना दिसले ते नागपुर येथे ऑफिसच्या कामासाठी जात होते आपले काम बाजुला सारून जखमी तरूणांना मदत केली रक्तबंबाळ असलेल्या तरुणांना आपल्या स्वतःच्या वाहनांमध्ये घेऊन हॉस्पिटलमध्ये भरती केले यामुळे त्यांची गाडी रक्ताने लाल झाली होती आणि या तरुणांवर लगेचच उपचार सुरू झाले त्यामुळे अपघात ग्रस्तांसाठी प्रमोद बिजवे हा एक देवदूत म्हणून उभा राहिला आजही समाजामध्ये अशा प्रकारची मदत करणारे लोक आहेत अशी भावना अपघात ग्रस्तांच्या नातेवाईकांनी व्यक्त केली तसेच साहुर गावातील लोकांनी सुद्धा कौतुक केले तसेच शिवसेना शाखा साहुरच्या वतीने समोर होऊ घातलेल्या कार्यक्रमात प्रमोद बिजवे यांनी केलेल्या कामाची पावती म्हणून त्यांचा सत्कार सुद्धा करण्यात येणार असल्याचे मत शिवसेना शाखा साहुरचे पदाधिकारी विजय गावंडे प्रविण मोहिते शाम शिर्के प्रफुल मुंदाने छगन ढोरे प्रविण धांदे विजय शिंदे शरद वरकड इत्यादींनी सांगितले हे विशेष.