अपघाताच्या ‘गोल्डन अवर’मध्ये जीव वाचविण्याचा प्रयत्न; NH-361 वर पोलिसांचे विशेष अभियान

0

🔥अपघाताच्या ‘गोल्डन अवर’मध्ये जीव वाचविण्याचा प्रयत्न; NH-361 वर पोलिसांचे विशेष अभियान.

🔥हळदगाव टोल ते सालोड दरम्यान 46 किमी पट्ट्यासाठी आपत्कालीन संपर्क क्रमांक जाहीर

सेलू -/ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 361 वरील वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर अपघातग्रस्तांना ‘गोल्डन अवर’मध्ये तातडीची मदत उपलब्ध व्हावी, या उद्देशाने पोलिस प्रशासनाने विशेष अभियान सुरू केले आहे. हळदगाव टोल प्लाझा ते सालोड-हिरापूर या सुमारे 46 किलोमीटरच्या महामार्ग पट्ट्यात अपघात झाल्यास त्वरित मदत मिळावी यासाठी विविध आपत्कालीन संपर्क क्रमांक नागरिकांसाठी जाहीर करण्यात आले आहेत.या अभियानाअंतर्गत अपघाताची माहिती मिळताच रुग्णवाहिका, वैद्यकीय अधिकारी आणि पोलिस यंत्रणा तातडीने घटनास्थळी पोहोचून जखमींना उपचारासाठी रवाना करण्यावर भर देण्यात येणार आहे. अपघातानंतरचा पहिला तास हा जीव वाचविण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात असल्याने या कालावधीत मदत पोहोचविण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे.अपघात झाल्यास नागरिकांनी घाबरून न जाता तात्काळ संबंधित क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी रुग्णवाहिका – 9111155504, दिवसपाळीत डॉक्टर – 9179735007, रात्रपाळीत डॉक्टर – 8827757984, तसेच राष्ट्रीय महामार्ग टोल-फ्री हेल्पलाइन 1033 किंवा आपत्कालीन सेवा 112 या क्रमांकांवर संपर्क साधता येणार आहे.महामार्गावरील वाहनचालकांनी वेगमर्यादेचे पालन करणे, वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळणे आणि आपत्कालीन परिस्थितीत त्वरित माहिती देऊन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन सहाय्यक पोलिस निरीक्षक पंकज वाघोडे यांनी केले आहे. अपघातांचे प्रमाण कमी करण्याबरोबरच अपघातग्रस्तांचा जीव वाचविण्याच्या दृष्टीने हे अभियान महत्त्वपूर्ण ठरणार असल्याची अपेक्षा यातून व्यक्त होत आहे.

      चैताली गोमासे साहसिक News-/24 सेलू 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!