अवकाळी पावसाचा कहर तालुक्यात सुरूच गारपिटीचा फटका..
आष्टी शहीद /तालुक्यात सतत अवकाळी पावसाचा कहर सुरूच असून आज दि.24 24 एप्रिल ला 5वाजताच्या सुमारास अवकाळी पाऊस झाला.असून या मध्ये सोबत गार पडल्यानेशेतकऱ्यांच्या पिकांना फटका बसत असल्याने शेतकऱ्यांचे शेतात असलेल्या पिकांचे मोठे नुकसान होत आहे त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
सविस्तर वृत्त असे की 24 एप्रिल रोजी आष्टी तालुक्यात पुन्हा अवकाळी पावसाने हजेरी लावली असता या अवकाळी पाऊस बरसला या मध्ये बोरी सारखी गार पडल्याने यामध्ये संत्रा मोसंबी गहू कांदा यासह भाजी पाला पिकांचे नुकसान झाले आहे सतत अवकाळी व वादळी पाऊस येत असल्याने या पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातात घास हिरावून जात असल्याने शेतकरी चिंतेत दिसत आहे सध्या स्थिती त तालुक्यात मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादक तसेच संत्रा उत्पादक शेतकरी असल्याने या शेतकऱ्याचे नुकसान होत आहे. कांदा पीक काढणीला आले असून काही शेतकऱ्याचे काढलेले कांद्याचे पीक खराब होत आहे तसेच असाच पाऊस सुरू राहिला तर पावसामुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार हे मात्र निश्चित आहे. तसेच अनेकांचे गहू शेतात उभे असताना काढणीला आलेला गव्हाचे पीक वाया जाण्याच्या मार्गावर आहे एवढा सारा अवकाळी पाऊस होऊनही शासनाकडून कोणत्याच प्रकारचे अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्याचे आदेश नसल्याने याकडे शासन व प्रशासन दुर्लक्ष करीत आहे त्यामुळे शेतकरी अहवालदिल झाला असून झालेल्या नुकसानीची पंचनामे करून भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.