आई-वडील सर्वात जवळचे मित्र त्यांच्याशी मुक्त संवाद करा,सिने अभिनेते सिद्धार्थ जाधव
🔥नागपूरमध्ये युथ यात्रा आणि लीडरशिप अवॉर्ड सोहळा.
🔥डॉ.तरिता शंकर,निर्मिती सावंत,सिद्धार्थ जाधवव शिक्षण तज्ञांनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद.
नागपूर -/ पालकांनी पाल्यांवर अन मुलांनी देखील पालकांवर अपेक्षांचे ओझे लादु नये. त्याऐवजी तुम्हाला वाटेल ते करा, तुमच्या आतील बाबींना हेरां आणि कोणाचाही विचार न करता पुढे जा, मात्र हे सर्व करत असताना आई-वडिलांना विश्वासात घ्या त्यांच्यासारखे सर्वात जवळचे मित्र जगात दुसरे कोणी नाहीत त्यांच्याशी सातत्याने संवाद साधा असा सल्ला आघाडीचा सिने अभिनेता सिद्धार्थ जाधव याने नागपुर शहरातील विद्यार्थ्यांना दिला.
पुण्यातील इंदिरा शिक्षण समुहाचे लवकरच इंदिरा विद्यारपीठात रूपांतर होतं आहे. त्यानिमित्त शनिवारी (ता. १८) आयोजित इंदिरा युथ यात्रा व लीडरशिप अवॉर्ड सोहळ्यात नागपूर शहरातील विद्यार्थी व पालकांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी इंदिरा समुहाच्या अध्यक्षा व चीफ मेंटॉर डॉ. तरिता शंकर, अभिनेत्री निर्मिती सावंत यांच्यासह शहरातील विद्यार्थी, पालक, विविध शिक्षण संस्थांचे पदाधिकारी, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रोहित रंजन आणि नागपूर आरजे श्रावणी चौधरी या माजी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.
सिद्धार्थ जाधव आणि निर्मिती सावंत यांच्याशी विद्यार्थी आणि पालकांनी मनसोक्त संवाद साधला. त्यांच्या विविध प्रश्नांची उत्तरे देताना दोघांनीही उपस्थितांना खळखळून हसविले, शूटिंग दरम्यानचे किस्से, गंमती-जमती सांगतानाच संघर्षाच्या काळातील खाच-खळगे आणि हळवे कोपरे हळुवारपणे मांडले. यशाने हुरळून न जाता, अपयशाने खचूनही न जाता त्यातून बोध घेत जीवन जगायला शिका असा संदेश त्यांनी दिला. डॉ. तरिता शंकर म्हणाल्या, गेल्या तीस वर्षात मी केवळ माणसे कमविली. माणसे ओळखून त्यांना योग्य संधी देने हे उत्तम प्रशासकाचे उदाहरणं आहे. जगभरातील विवीध देशांशी शैक्षणिक करार होणार आहेत. प्राचार्या डॉ. अंजली काळकर, रेणू गर्ग यांनी सूत्रसंचालन केले.
🔥या मान्यवरांचा झाला सन्मान
चंद्रकांत खंडेलवाल, प्रदीप शेंडे, वैभव गंजापुरे, हितेश मेश्राम, अनुपकुमार भार्गव, सुनिल तिजारे, अश्विनी देशकर, दिनेश टेकाडे, गजानन उमाटे, निखिल जानबंधू, अमित टीमांडे, जितेंद्र शिंगटे, एकता भिरुंडे, कमल मुंगघाटेआदी पत्रकारांना जर्णलिस्ट एक्सलन्स तर भागेश्वरी खेमचंदानी, धनराज गुप्ता, राजेंद्र पौनीकर, डॉ. सलीम चव्हाण, डॉ. अभय शेंडे, राहुल गजभिये, श्रावणी चौधरी, डॉ. अमित इंगळे, संदीप लांडगे, लोकेश येळाणे, डॉ. प्रशांत लांजेवार, डॉ. रितेश भाटे, डॉ. तुषार सांबरे, परिनाझ अली यांना लीडरशिप अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले.
ब्युरो रिपोर्ट साहसिक NEWS-/24 वर्धा,नागपूर