औरंगाबाद,पैठण -/तालुक्यातील बिडकीन येथील पैठण रोडवरील गट क्र.८२३ मध्ये सन २०१२ मध्ये सरकारी रस्त्यावर प्लॉट पाडून विकून आदित्य बिल्डर्स अँड डेव्हल्पर्स तर्फे कैलास नानासाहेब पवार यांनी खोटी बनावट माहिती व कागद पत्राद्वारे विक्री केल्याने अनेकांची फसणूक झाल्याने बिडकीन येथील प्लॉट धारकांनी तक्रार बिडकीन पोलिस ठाण्याला दिली आहे. गट क्र.८२३ मध्ये उत्तर दिशेला कोणतीही जिल्हाधिकारी यांची अकृषिक परवानगी नसताना व नगर रचना कार्यालय यांच्या रेखांकन मंजुरिशिवाय ले आऊट मंजूर न करता जमिनीचा रहिवासी व वाणिज्य प्रयोजनार्थ उपयोग करून त्यावर बेकायदेशीर एकूण ३६ प्लॉटचे श्रद्धा नगर नावाने वसवून त्याची बेकायदेशीर रित्या विक्री केली. गट नंबर ८२३ मध्ये श्रध्दा नगर नावाने नगर वसवून त्यामध्ये अनेकांची आर्थिक फसवणुक झाल्याने बिडकीन पोलिस ठाण्यात चार मार्चला तक्रार अर्ज देऊन सुद्धा कारवाई होत नसल्याने काही प्लॉट धारकांनी ग्रामीण पोलीस अधिक्षक छञपती संभाजीनगर येथे ३० मे रोजी तक्रार केली असून अजूनही बिल्डरची कुठलीही चौकशी करण्यात आलेली नाही लवकरात लवकर संबंधीतआदित्य बिल्डर अँड डेव्हपर्स आणि कैलास पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी प्लॉट धारकांनी केली आहे.मिळकत गटात शेतकऱ्यांना जाण्यायेण्यासाठी गट क्र.८२२ व ८२३ चे मधोमध अभिलेखाप्रमाने मिळकती मधून पूर्वापार वहीवाटीचा गाडीरस्ता पुढे गट क्र.८२४ मधून छत्रपति संभाजीनगर ते पैठण रोडला मिळत असलेल्या ठिकाणापर्यंत होता असा अर्ज दि.२८/०९/२०२० रोजी काही शेतकऱ्यांनी केला. या अर्जाचा विचार व आदेश काढून पैठणचे तहसिलदार सारंग चव्हाण यांनी दि.२१/१२/२०२३ रोजी गट क्र.८२३ मधून रस्ता मोकळा करून दिला. परंतू या गटात एकुण ३६ प्लॉट धारकांचे प्लॉट व पक्के बांधकाम तोडण्यात आले असून विक्री केलेल्या प्लॉट ची चतू:र्सिमा यामध्ये मोठी तफावत व खोटी माहिती देऊन पवार याने सरकारी रस्ता हा प्लॉट दाखवून दिशाभूल करून अनेकांची प्लॉट लाखो रुपयांना विक्री करून प्लॉटधारकांची जाणून बुजून स्वतः च्या आर्थिक फायद्यासाठी बेकायदेशिररित्या विक्री केली मोठया प्रमाणात लाखो रुपयांची आर्थिक फसवणुक व नुकसान झाल्याचे समजल्यावर प्लॉट धारक ओमप्रकाश जैस्वाल,राजेंद्र जैस्वाल, कैलास हिवाळे, अर्जुन टेके, संजय हिवाळे, सखाराम हिवाळे , शेख अस्लम शेख बशीर,तसेच इतर प्लॉट धारक यांनी बिडकीन पोलीस ठाण्यात संबंधीत आदित्य बिल्डर्स अँड डेव्हलपर्स तर्फे कैलास नानासाहेब पवार याच्यावर कारवाई करण्यासाठी दि.४ मार्च २०२४ रोजी तक्रार अर्ज दिला असून व दि.३० में २०२४ रोजी ग्रामीण पोलीस अधिक्षक मनीष कलवानिया छञपती संभाजी नगर यांना तक्रार अर्ज देऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.