यवतमाळ -/ आर्णी नगरपरिषदेवर दुपारी तीनच्या सुमारास विविध समित्या सभापती पदांची निवड प्रक्रिया पार पडली आहे आर्णी नगर परिषदेत नगराध्यक्षपदी काँग्रेसकडे असून उपनगराध्यक्षपदी शिंदेसेनेकडे आहे.नगर परिषदेच्या विषय समितीच्या सभापती निवडीसाठी शुक्रवारी विशेष सभा बोलावण्यात आली. बैठकीस पिठासीन अधिकारी म्हणुन उमरखेड येथील उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे यांनी तर सहाय्यक पिठासीन अधिकारी म्हणुन मुख्याधिकारी रवींद्र यांनी काम पाहीले यात बांधकाम सभापतीपदी अंजलीताई खंदार (राष्ट्रवादी अजित पवार) आरोग्य सभापतीपदी अन्वर पठाण (राष्ट्रवादी अजित पवार) शिक्षण सभापती पदी संजय व्यवहारे (राष्ट्रवादी अजित पवार) पाणीपुरवठा सभापतीपदी छबुताई चारोडे(शिंदे सेना) महिला बाल विकास सभापतीपदी चैताली देशमुख (भाजप) महिला बाल विकास उपसभापतीपदी शितल प्रवीण काळे (उबाटा) यांची निवड करण्यात आली आहे या निवड प्रक्रियेत नगराध्यक्ष नालंदा भरणे उपनगराध्यक्ष निलेश गावंडे राष्ट्रवादीचे नेते साजिद बेग शेखर खंदार काँग्रेसचे नेते आरीज बेग मिर्झा शिंदे सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष विष्णू उकंडे भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष रवींद्र राठोड व राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सुनील पोतगंटावार यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.