आर्वीत बंजारा समाजाने मातृ शक्तीचा केला गौरव तीज सण केला उत्साहात साजरा; सिंधू संस्कृतीची जोपासली परंपरा…

0

आर्वी -/ भारतीय संस्कृतीत प्रत्येक जाती धर्मातील विविध उत्सव वेगवेगळ्या ढंगाने व परंपरेने साजरे केले जातात. त्यामुळेच आपल्या देशातील विविधतेत एकता दिसून येते. इसवी सन पूर्वपासून बंजारा समाजात चालत आलेला सर्वात महत्वाचा सण तीज उत्सव असुन येथील बंजारा समाजाने मोठ्या उत्साहाने साजरा करुन सिंधू संस्कृतीची जोपासणा केली
कधीकाळी डोंगरदऱ्यात राहणाऱ्या बंजारा समाजात तीज म्हणजे आनंदाची पर्वणीच असते. श्रावण महिन्यात ठिकठिकाणी बंजारा तांड्यांवर तिज उत्सवाची लगबग पाहायला मिळते. महिला प्रधान संस्कृतीचे दर्शन घडवणारा हा उत्सव मातृ शक्तीला वंदन करणारा असून, आद्यगण “गण गौर” यांचे महत्व विशद करणारा आहे. सालाबादा प्रमाणे येथे सुध्दा या उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यात पारंपारिक वेशभूषेत सहभागी झालेल्या महिला मुलींनी डफड्याच्या तालावर बंजारा लोगगीताची गारुड घालत फेर धरून पारंपरीक नृत्य सादर केले. तद्नंतर श्रीकृष्ण मुर्तीचे पुजन करुन मुलींनी पेरलेल्या गौरी स्वरुप धान टोपलीची शहरातून मिरवणू काढून त्याचे विसरजण सावळापुर घाटतील नदी मध्ये करुन तिज उत्सवाचा समारोप केला.
सिंधू संस्कृतीची परंपरा जपणार तिज उत्सव आगळावेगळाच
तिज हा उत्सव म्हणजे बंजारा समाजाची दिवाळीच. तिज म्हणजे बंजारा समाजाच्या लोक संस्कृतीचे सर्व पदर आणि पैलू उलगडणारा उत्सव. या उत्सवात दहा दिवसाआधी अविवाहित मुली एका टोपलीत ‘गौरी स्वरूप’ धान (गहू) पेरतात, रोज त्याला पाणी घालून बोलीभाषेत आराध्य देवतांची गीते म्हटली जातात. विसर्जनाच्या दिवशी डोक्यावर ‘गौरी’स्वरूप धानाची टोपली घेऊन वाजत गाजत तांड्याला प्रदक्षिणा केली जाते. लग्न होऊन सासरी गेलेल्या मुली, महिला तिज उत्सवाच्या निमित्याने माहेरी येतत. त्यामुळे या उत्सवाला वेगळे महत्त्व आहे.

राजू डोंगरे साहसिक news -24 आर्वी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!