आष्टी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या उदासीनतेमुळे शेतकऱ्यांची लाखो रुपयांची फसवणूक

0

🔥आष्टी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या उदासीनतेमुळे शेतकऱ्यांची लाखो रुपयांची फसवणूक.

साहुर -/ आष्टी तालुक्यातील साहुर परिसरात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांसाठी योजनांचा गाजावाजा करणे सुरू आहे परंतु या योजनेमुळे या कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या उदासीनतेमुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट निर्माण झालेले आहेत गेल्या चार-पाच वर्षाच्या आधी कांदा चाळीसाठी शेतकऱ्यांनी रीतसर अर्ज केलेले होते ते अर्ज चार-पाच वर्षाच्या नंतर पोर्टलवर आले त्यानुसार शेतकऱ्यांनी कांदा चाळीसाठी लागणारे कागदपत्रे ऑनलाईन अपलोड केली त्यानंतर शेतकऱ्यांना कांदा चाळ बांधणीसाठी तगादा लावला त्यानुसार शेतकऱ्यांनी दोन लाख रुपये लावून कांद्याची चाळ निर्माण केल्या आणि सुरुवातीपासूनच जिओ टॅगिंग नुसार फोटो सुद्धा आष्टी तालुका कृषी कार्यालयात कर्मचाऱ्यांकडे पाठवण्यात आले व वेळोवेळी शेतकऱ्यांनी सूचना सुद्धा दिल्या आणि कांदा चाळ पूर्ण तयार झाल्यावर पाहणी साठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील कर्मचारी पाहणीसाठी आले आणि त्यांनी सांगितले की अशा प्रकारची कांदा चाळ पाहिजे नसून आम्हाला आम्हच्या पद्धतीने पाहिजेत व आम्ही याचे अनुदान देऊ शकत नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी दोन लाख रुपये खर्च करून जी कांदा चाळ बांधलेली आहेत त्यांचे काय? जर ताजमहाल सारखी कांदा चाळ पाहिजे होती तर या कर्मचाऱ्यांनी सुरुवातीपासूनच स्थळाला भेटी देऊन कशा पद्धतीने कांदा चाळ करायची याची माहिती द्यायला हवी होती परंतु जाग्यावरून कार्यालयातून इशारे देऊन शेतकऱ्यांना नाचवण्याचा हा धंदा अतिशय घृणास्पद आहे त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे तात्काळ लक्ष देऊन याची चौकशी करून अहवाल दोषी कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी शेतकरी करीत आहे आणि लेखी तक्रार सुद्धा देणार असल्याचे सांगितले हे विशेष.

       शरद वरकड साहसिक     News-/24 साहूर,आष्टी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!