आष्टी ते कारंजा (घा.)मार्गांवर लावलेली लहान रोपे मरणासन्न अवस्तेत….

0

🔥आष्टी ते कारंजा (घा.)मार्गांवर लावलेली लहान रोपे मरणासन्न अवस्तेत.

🔥सहा महिन्यापासून पाण्याचा थांग पत्ता नाही, प्रशासनाचे दुर्लक्ष.

आष्टी शहीद -/ आष्टी ते कारंजा घा. या मार्गांवर सिमेंट रस्त्याचे बांधकाम सुरु असल्यामुळे लहान रोपांना पाणी दिले नसल्याने लावलेली रोपे मारणासन्न अवस्तेत असून शेवटची घटका मोजत आहे. प्रशासकीय यंत्रणा मात्र या मार्गांवर शोधून दिसत नसल्याने लहान रोपांना आता वाऱ्यावर सोडण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
आष्टी ते कारंजा (घा.)या मार्गांवर गेल्या वर्षांपासून खोदकाम करून सपा्टीकरण करण्यात आले. त्यावेळी सुरवातीला मोठं मोठी सागाची, बाभाळीची, इतर जातीची बहारदार वटवृक्ष तोडण्यात आली मात्र ती मोठी झाडें तोडल्यावर लहान रोपे लावण्यात आली नव्हती. गावाकर्यांनी तक्रारी केल्यावर प्रशासण्णाला जाग आली तेव्हा कुठे रस्त्याच्या काठाणे लहान रोपे लावण्यात आली. रोपे लावली मात्र त्या रोपांना पाणी देण्यासाठी कुणीच पुढे आला नाही. सध्या उन्हाळा तापायला सुरवात झाली आणि लहान रोपांनी मान खाली टाकली. लहान रोपे पाणी नसल्याने मरणार आहे. या मार्गांवर फेरफटका मारला असताना लहान रोपे काही मेली तर काही मात्र काड्या रूपात उभी आहे. काही मारणासन्न अवस्तेत असून शेवटची घटका मोजत आहे. एखादे मोठे झाड तोडायचे असेल तर त्या बदल्यात दहा झाडें लावायला पाहिजे असे शासकीय अधिकारी आवर्जून सांगतात. सिमेंट रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात असताना लहान रोपे मात्र दुर्लक्षित राहणार काय असा प्रश्न वृक्ष प्रेमिना पडला आहे. या मार्गांवर सार्वजनिक बांधकाम विभागाचा कोणताही अधिकारी शोधून दिसत नसल्याने सिमेंट रस्ता बांधकाम करणाऱ्या कंत्राट दारानी मनमानी करून शासकीय व वन विभागाचे नियम धाब्यावर बसवून काम करण्याचा सपाटा सुरु आहे. लहान रोपांना जीवदान कोण देणार हे मात्र कोडे आहे.

प्रशांत ठाकरे माजी उपसरपंच बोटोणा
लहान रोपे लावल्यापासून त्या रोपांना पाणी न दिल्यामुळे रोपे मरणाच्या दारात आहे. आष्टी ते कारंजा (घा.)या रस्त्याच्या काठाणे लावलेल्या झाडांना पाणी दिले नाही.पाणी नसल्याने लहान रोपटे मारणासन्न अवस्तेत आहे.शासकीय यंत्रणा मात्र झोपेचे सोंग घेऊन आहे. दखल घेत नसेल तर आता आंदोलन करावे लागेल.

              नरेश भार्गव                         साहसिक News-/24 आष्टी शहीद 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!