इंटरनॅशनल बॉडी बिल्डिंग स्पर्धेत खेळाडू संतोष वाघ चौथ्या क्रमांकाचा मानकरी
देवळी / : सागर झोरे
देवळी शहरापासून पंधरा किलोमीटर अंतरावर असलेलं बोरगाव मेघे येथील राहणारे संतोष वाघ हे पुणे येथे 15 ते 17 एप्रिल दरम्यान संपन्न झालेल्या इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ बॉडी बिल्डिंग मिस्टर अँड मिस युनिव्हर्स स्पर्धेत वर्धेतील राष्ट्रीय खेळाडू संतोष वाघ याने नेत्रदीपक खेळातील कौशल्याने चौथा क्रमांक पटकाविला. तसेच वर्धा शहरातच नव्हे तर संपूर्ण राज्यात मराठी टायगर या नावाने प्रसिद्ध असलेला बॉडीबिल्डिंग या खेळातील राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू संतोष वाघ याने 170 विविध देशातील खेळाडूंचे भाग घेतलेल्या मिस्टर युनिव्हर्सल बॉडी बिल्डिंग चॅम्पियन स्पर्धेत 100 किलो वजन गटात भारतातर्फे प्रतिनिधित्व करीत चौथ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळविले तसेच बोरगाव मेघे येथील रहिवासी असलेले उत्कृष्ट कला शिक्षक गणेश वाघ यांचा सुपुत्र असून त्याने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत कठीण प्रयत्नातून स्वतःला सिद्ध केले संतोष धामणगाव अभियांत्रिकी महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी आहे.तसेच संतोष ने इलेक्ट्रॉनिक विषयात इंजिनियरिंगची पदवी मिळाली पण करिअर मात्र त्याने बॉडी बिल्डिंग या खेळातच तयार केले तसेच संतोषचा स्वतःचा टायगर जिम असून वर्धेतील असंख्य विद्यार्थ्यांना या खेळातील कौशल्य देत त्यांना पाठविण्यात मोलाची कामगिरी पार पाडत आहे.त्याचप्रमाणे मिस्टर युनिव्हर्सल बॉडीबिल्डिंग चॅम्पियन स्पर्धेत संतोष वाघ चौथ्या क्रमांकाचा मानकरी ठरल्याने त्याचा या अभिमानास्पद यश मिळवून दिल्यामुळे त्यांचे माझी बॉडी बिल्डर अश्विन साहू व शहीद भगतसिंग व्यायाम शाळा सालोड चे अध्यक्ष संजीव वाघ यांनी संतोष वाघ यांचे अभिनंदन करून कौतुक केले. तसेच जिल्ह्यासह क्रीडा रसिकांमध्ये भरभरून कौतुक केले असता संतोष वाघ यांच्या परिवारातील आनंद व्यक्त होत आहे.